अनुदान न मिळाल्यास उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:48 AM2021-03-01T04:48:38+5:302021-03-01T04:48:38+5:30
ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी तसेच मागासवर्गीय लाभार्थींना घरकुलाचा लाभ देण्यासाठी पंतप्रधान व रमाई आवास योजना राबविण्यात येते. कोरोनाकाळात एप्रिल ...
ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी तसेच मागासवर्गीय लाभार्थींना घरकुलाचा लाभ देण्यासाठी पंतप्रधान व रमाई आवास योजना राबविण्यात येते. कोरोनाकाळात एप्रिल ते जून २०२० या कालावधीत घरकुल बांधकामे ठप्प झाली होती. त्यानंतर बांधकामाला परवानगी मिळाल्याने टप्प्याटप्प्याने बांधकामे सुरू झाली; परंतु शासनाकडून निधी मिळण्यास विलंब झाला. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत शासनाकडून टप्प्याटप्प्याने निधी मिळाला आणि बांधकामालादेखील गती मिळाली. अनुदान वितरणाची कार्यवाही सुरू असली तरी वेग मंदावला असल्याने लाभार्थींमधून नाराजीचा सूर उमटत आहे. काही लाभार्थींनी कर्ज काढून तसेच उसनवारी करून घरकुलाचे बांधकाम केले. आवश्यक ती कागदपत्रेही संबंधित पंचायत समिती प्रशासनाकडे सादर केली. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील अनुदान मिळण्यास विलंब होत आहे. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी लाभार्थींनी केली.