वाशिम जिल्हाधिका-यांना बजावण्यात आला जामीनपात्र वॉरंट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 07:12 PM2017-12-17T19:12:58+5:302017-12-17T19:14:44+5:30
फ्लोराईडमिश्रित पाण्यामुळे होणाºया ‘फ्लोरोसिस’ या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी देण्यात आलेल्या आदेशांचे पालन न केल्याने राज्यातील १२ जिल्हाधिकाºयांना जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. त्यात वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांचाही समावेश असून हरित लवादाच्या या आदेशाचे पालन करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी रविवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: फ्लोराईडमिश्रित पाण्यामुळे होणाºया ‘फ्लोरोसिस’ या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी देण्यात आलेल्या आदेशांचे पालन न केल्याने राज्यातील १२ जिल्हाधिकाºयांना जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. त्यात वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांचाही समावेश असून हरित लवादाच्या या आदेशाचे पालन करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी रविवारी दिली.
दोन बोअरवेलमधील अंतर, खोली यासंदर्भात लवादाने नियम घालून दिले आहेत. त्याचे पालन न झाल्याने पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण वाढून अनेकांना ‘फ्लोरोसिस’ या आजाराला सामोरे जावे लागले. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लवादाने दिलेल्या आदेशांचे पालन करण्यात जिल्हाधिकाºयांकडून कुचराई झाल्याचा ठपका ठेवत हरित लवादाने जिल्हाधिकाºयांना जामीनपात्र वॉरंट बजावण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले होते. त्यानुसार, ही कार्यवाही करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली.
हरित लवादामार्फत पाठविण्यात आलेला जामीनपात्र वॉरंट प्राप्त झाला असून यासंदर्भातील आवश्यक माहितीचा अहवाल लवादाकडे पाठविला जाईल.
- राहुल व्दिवेदी, जिल्हाधिकारी, वाशिम