वाशिम: खरीप पीकविम्याचा १३२४४ शेतकऱ्यांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 10:53 AM2020-12-11T10:53:10+5:302020-12-11T10:56:39+5:30
Washim News १३ हजार २४३ शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पीकविमा काढणाऱ्या आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या १३ हजार २४३ शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला आहे. पीकविम्यापोटी या शेतकऱ्यांना ६८५ कोटी ३३ लाख रुपयांची भरपाई मिळणार असून, त्यापैकी २२९१ शेतकऱ्यांच्या खात्यात ९०.४० लाख रुपयांची रक्कमही जमा झाली आहे.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ७१ हजार शेतकऱ्यांनी १ लाख ९२ हजार ८२ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांसाठी विमा उतरविला होता. त्यासाठी शेतकऱ्यांनी ८०९ कोटी रुपयांचा भरणा पीकविमा कंपनीकडे केला होता. यंदाच्या हंगामात विविध स्थानिक नैसर्गिक आपत्तीसह परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यात सोयाबीनच्या नुकसानाचे प्रमाण अधिक होते. या नुकसानापोटी शेतकऱ्यांनी पीकविमा मिळण्यासाठी कृषी विभाग आणि पीकविमा कंपनीकडे आॅनलाईन आणि आॅफ लाईन पद्धतीने रितसर अर्ज केले. या अर्जानुसार पीकविमा कंपनीने सर्वेक्षण केले असता प्रत्यक्ष स्थानिक आपत्तीने ५ हजार ६६१ शेतकºयांचे नुकसान झाल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे नुकसानापोटी या शेतकऱ्यांना ९३.४४ लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे, तर काढणी पश्चात परतीच्या पावसामुळे ७ हजार ५८३ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले असून, या शेतकºयांना नुकसानपोटी ५ कोटी ९१ लाख८९ हजार रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. अर्थात दोन्ही प्रकारातील नुकसानापोटी एकूण १३ हजार २४४ शेतकºयांना ६८५.३३ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असून, एकूण २२९१ शेतकºयांच्या खात्यात ९० लाख ४९ हजार रुपयांची रक्कमही जमा करण्यात आली आहे.
पीकविम्याचा लाभ मिळालेले शेतकरी
प्रकार शेतकरी संख्या रक्कम
स्थानिक आपत्ती ५६६१ ९३.४४
काढणी पश्चात ७५८३ ५९१.८९
-------------------------------------
एकूण १३२४४ ६८५.३३
५ हजार शेतकरी वचिंत
जिल्ह्यात स्थानिक आपत्ती आणि परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी १८ हजारांहून अधिक शेतकºयांनी कृषी विभाग आणि पीकविमा कंपनीकडे आॅनलाईन आणि आॅफलाईन पद्धतीने तक्रारी केल्या. तथापि, यात निकषात न बसल्याने आणि तक्रारीस विलंब झाल्याने ५ हजारांहून अधिक शेतकºयांना पीकविम्याचा लाभ मिळू शकला नाही.
खरीप हंगामात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानापोटी १३ हजार २४४ शेतकºयांना ६८५ कोटी ३३ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. त्यापैकी २ हजार २९१ शेतकºयांच्या खात्यात पीकविम्याची रक्कमही मंजूर झाली आहे.
-शंकरराव तोटावार,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम