वाशिम :  २.५ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 02:40 PM2019-12-22T14:40:55+5:302019-12-22T14:41:11+5:30

जिल्ह्यातील शेतकºयांचे सुमारे ५०० कोटींचे कर्ज माफ होईल, असे जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले.

Washim: 2.5 lakh farmers will get loan waiver | वाशिम :  २.५ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

वाशिम :  २.५ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यभरातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे तथा दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार, २१ डिसेंबर रोजी विधानसभेत केली. या निर्णयामुळे शासनाच्या निकषानुसार वाशिम जिल्ह्यातील सुमारे २ लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या ९० हजार शेतकºयांसह कर्ज पुनर्गठण झालेले तथा जुन्या कर्जमाफी योजनेतील लाभ न मिळालेल्या सुमारे १ लाख ६० हजार शेतकºयांनाही कर्जमाफी मिळणार आहे. त्यानुसार, कर्जमाफीचा हा आकडा सुमारे ५०० कोटीपर्यंत जाईल, अशी माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी दिली.
आॅक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस यासह गत काही महिन्यांमध्ये सातत्याने उद्भवणाºया नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचला आहे. या पृष्ठभुमिवर महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करून शेतकºयांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ करण्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. कर्जमाफीच्या प्रक्रियेची सुरूवात ही मार्च २०२० या महिन्यापासून होणार आहे. कर्जमाफीचे पैसे शेतकºयांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तसेच कर्जाचे हप्ते नियमित भरणाºया शेतकºयांसाठी येत्या १५ दिवसांत योजना जाहीर केली जाईल, अशी घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली.
दरम्यान, आज जाहीर झालेल्या निर्णयास अनुसरून शासनाच्या निकषानुसार वाशिम जिल्ह्यातील २०१४-१५ पासून थकबाकीदार असलेल्या ९० हजार शेतकºयांना २ लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळण्यासोबतच कर्ज पुनर्गठण आणि यापूर्वी शासनस्तरावरून जाहीर झालेल्या कर्जमाफीस पात्र ठरलेले; परंतु अद्यापपर्यंत कर्ज माफ न झालेल्या शेतकºयांनाही लाभ दिला जाणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील शेतकºयांचे सुमारे ५०० कोटींचे कर्ज माफ होईल, असे जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले.


विधानसभेत शनिवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाच्या निकषानुसार ८० ते ९० हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यासह कर्ज पुनर्गठण आणि जुन्या कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकºयांनाही पीक कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे.
- रमेश कटके
जिल्हा उपनिबंधक, सह. संस्था

 

Web Title: Washim: 2.5 lakh farmers will get loan waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.