वाशिम: संजय गांधी निराधार योजनेच्या सभेत ३३१ पात्र प्रकरणांना मंजूरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 06:49 PM2018-01-16T18:49:35+5:302018-01-16T18:51:25+5:30
वाशिम: स्थानिक तहसील कार्यालयांतर्गत संजय गांधी निराधार योजना समितीची सभा सोमवारी पार पडली. यावेळी संजय गांधी व श्रावण बाळ योजनेअंतर्गत दाखल ४४१ प्रकरणांपैकी ३३१ प्रकरणांना समिती सदस्य व अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वानुमते मंजूरी दर्शविण्यात आली.
वाशिम: स्थानिक तहसील कार्यालयांतर्गत संजय गांधी निराधार योजना समितीची सभा सोमवारी पार पडली. यावेळी संजय गांधी व श्रावण बाळ योजनेअंतर्गत दाखल ४४१ प्रकरणांपैकी ३३१ प्रकरणांना समिती सदस्य व अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वानुमते मंजूरी दर्शविण्यात आली. त्रुट्यांमध्ये अडकलेली ११० प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष शरद पाटील चव्हाण होते. नायब तहसीलदार नप्ते, समिती सदस्य धनंजय हेंद्रे, विनोद मगर, गजानन गोटे, प्रल्हाद गोरे, भगवान कोतीवार, पवन जोगदंड, कल्पना खामकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत एकंदरित १९० प्रकरणे दाखल होती. त्यापैकी १२९ प्रकरणे पात्र, तर ६१ प्रकरणे अपात्र ठरली. श्रावण बाळ योजनेअंतर्गत २५१ प्रकरणे आॅनलाईन दाखल झाली होती. त्यापैकी २०२ प्रकरणे पात्र, तर ४९ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. आगामी बैठक फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस घेण्यात येणार असून, संबंधित अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी त्रुट्यांची पुर्तता करून प्रकरणे पुन्हा दाखल करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.