वाशिम : ८६४ उमेदवारांनी दिली चाळणी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 01:26 PM2018-10-02T13:26:20+5:302018-10-02T13:26:37+5:30
वाशिम : स्पर्धा परीक्षेसंदर्भात मोफत पूर्व प्रशिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून वाशिम येथील केंद्रावर १२०० पैकी ८६४ उमेदवारांनी चाळणी परीक्षा दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्पर्धा परीक्षेसंदर्भात मोफत पूर्व प्रशिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून वाशिम येथील केंद्रावर १२०० पैकी ८६४ उमेदवारांनी चाळणी परीक्षा दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग महाराष्ट्र शासन पुणे व प्रसंग मागासवर्गीय समाजकल्याण संस्था, जयपूर यांच्यामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी बँक, रेल्वे, एल.आय.सी. इत्यादी लिपिकवर्गीय व तत्सम पदाच्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी करिता नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षण वाशिम शहरात दिले जाते. या प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी स्थानिक मालतीबाई सरनाईक विद्यालयात चाळणी परीक्षा घेण्यात आली. या चाळणी परीक्षेसाठी एकूण १२०४ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी ८६४ उमेदवारांनी परीक्षा दिली. यामधून पात्र १०० आणि प्रतिक्षा यादीसठी २० अशा उमेदवारांची गुणानूक्रमे निवड केली जाणार आहे. ३० टक्के महिला, ३ टक्के दिव्यांग व ६७ टक्के पुरुष अशी १०० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना ८ आॅक्टोबरपासून नियमित चार महिन्याचे मोफत प्रशिक्षण आणि मासिक तीन हजार रुपये विद्यावेतन व तीन हजार रुपये किंमतीची मोफत पुस्तके दिली जाणार आहेत. सदर चाळणी परीक्षा ही समाजकल्याण विभागाचे समतादूत साजिद पटेल यांच्या निरीक्षणाखाली व प्रसंग समाजकल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गजपाल इंगोले व कास्ट्राईक कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सहदेव चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत झाली.