वाशिम : ४५ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 02:29 PM2020-03-04T14:29:42+5:302020-03-04T14:29:47+5:30
सुमारे ४५ हजार शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण होऊन तसे प्रमाणपत्रही शेतकºयांना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत विशिष्ट क्रमांकासह जिल्ह्यातील ८३ हजार ६३४ शेतकऱ्यांची दुसरी यादी २९ फेब्रुवारी रोजी संबंधित गावांमध्ये प्रसिद्ध झाली. गत चार दिवसांत सुमारे ४५ हजार शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण होऊन तसे प्रमाणपत्रही शेतकºयांना देण्यात आले.
शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. कर्जखात्यात किती रक्कम थकीत आहे, त्याची शेतकºयांना माहिती देऊन मान्यता घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण केले जात आहे. विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध झालेल्या यादीत नाव असलेल्या शेतकºयांना आपल्या नावासमोरील विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक व बँक पासबुकसह आपले सरकार सेवा केंद्र अथवा संबंधित बँकेत जावून आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. आधार प्रमाणीकरण करताना कर्जमुक्तीच्या पोर्टलवर यादीतील विशिष्ट क्रमांक वा आधार क्रमांक टाकल्यानंतर संबंधित शेतकºयाचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, थकीत कर्जाची रक्कम संगणकाच्या स्क्रीनवर दिसते. ही माहिती अचूक व मान्य असेल तरच ‘मान्य’ पर्याय निवडून शेतकºयांनी आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी ३ मार्च रोजी केले.
कर्जरक्कम जूळत नसल्यास ‘अमान्य’ पर्याय उपलब्ध
संगणकाच्या स्क्रीनवर दिसणाº्या माहितीमधील आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, कर्जाची रक्कम जुळत नसल्यास किंवा रक्कम चुकीची असल्यास शेतकºयांनी ‘अमान्य’ पर्यायाची निवड करून आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. ‘अमान्य’ केलेली प्रकरणात संबंधित शेतकºयांची तक्रार जिल्हास्तरीय समितीकडे पाठविली जाणार आहे. त्यावर जिल्हास्तरीय समिती योग्य निर्णय घेणार आहे.
प्रत देणे बंधनकारक
शेतकºयाने मान्य अथवा अमान्य यापैकी कोणताही पर्याय निवडून आधार प्रमाणीकरण पूर्ण करणाºया शेतकºयांना संबंधित आपले सरकार सेवा केंद्र, बँकेने अथवा सहकारी सेवा सोसायटीने लगेचच पूर्ण झाल्याच्या प्रमाणीकरणाचे प्रमाणपत्र अथवा तक्रारीची प्रत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. या प्रमाणपत्रावर बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक व कर्ज रक्कम नमूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकºयांनी संबंधित आपले सरकार सेवा केंद्र अथवा बँकेत आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्राची प्रत प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.