वाशिम : रिक्त पदांमुळे पशुसंवर्धन विभाग हैराण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 05:01 PM2020-12-12T17:01:38+5:302020-12-12T17:04:34+5:30
Washim News: अनेक पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाज प्रभावित होत आहे.
वाशिम : जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागात अधिकारी व कर्मचाºयांची अनेक पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाज प्रभावित होत आहे.
जिल्ह्यात श्रेणी एकचे १७ व श्रेणी दोनचे ४१ अशा एकूण ५८ पशूवैद्यकीय दवाखाना व उपचार केंद्रांमधून जनावरांना वैद्यकीय सेवा दिली जाते. जिल्ह्यात अडीच लाखाच्या आसपास पशूधन असून, पशूधनाचे आरोग्य सांभाळण्यासाठी श्रेणी एकच्या दवाखान्यावर एलडीओ दर्जाची २१ पदे मंजूर आहेत. जिल्ह्यात सध्या शिरपूर, मालेगाव, किन्हीराजा, केनवड, पळसखेड, मानोली, शेलुबाजार, कामरगाव, मानोरा, पोहरादेवी या श्रेणी एकच्या पशुचिकित्सा केंद्रातील अधिकाºयांचे पद रिक्त आहे. याशिवाय मानोरा व मालेगाव येथील पशुधन विकास अधिकाºयाचे पद रिक्त आहे. त्यातही पशुवैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी हे ‘पदवीधर’ सापडत नसल्याने शवविच्छेदन अहवाल व इतर जबाबदार प्रस्ताव, कागदपत्र, प्रमाणपत्र देण्यातही अनेकवेळा अडचणी येतात. रिक्त पदे भरण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने शासनाकडे अनेकवेळा प्रस्ताव पाठविले, पाठपुरावादेखील सुरू आहे. परंतू, रिक्त पदांचा प्रश्न अद्याप पूर्णपणे निकाली निघाला नाही.