वाशिम : धरणग्रस्तांचा बुधवारी लघुपाटबंधारे कार्यालयावर महामोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 10:11 PM2018-01-15T22:11:50+5:302018-01-15T22:14:29+5:30
वाशिम : रिसोड तालुक्यातील मौजे बोरखेडी प्रकल्पातील पुनर्वसीत गाव कौलखेड येथे विविध विकासकामे सुरु करण्यासाठी धरणग्रस्तांच्या वतीने ग्रा.पं. सदस्य देवराव मोरे यांच्या नेतृत्वात बुधवार १७ जानेवारी रोजी लघु पाटबंधारे कार्यालयात महामोर्चा काढण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रिसोड तालुक्यातील मौजे बोरखेडी प्रकल्पातील पुनर्वसीत गाव कौलखेड येथे विविध विकासकामे सुरु करण्यासाठी धरणग्रस्तांच्या वतीने ग्रा.पं. सदस्य देवराव मोरे यांच्या नेतृत्वात बुधवार १७ जानेवारी रोजी लघु पाटबंधारे कार्यालयात महामोर्चा काढण्यात येणार आहे.
रिसोड तालुक्यात असलेले मौजे बोरखेडी लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत गावकर्यांची जमीन सन २००५-०६ मध्ये संपादित करण्यात आली, तसेच गावठाणाचे पुनर्वसन करण्यात आले असून नवीन गावठाणाची निर्मिती करण्यात आली. या गावठाण गावाच्या विकासासाठी बाधित झालेल्या धरणग्रस्तांनी अनेक वेळा संबंधीतांना निवेदने तसेच उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र याची दखल प्रशासनाने अद्यापही घेतली नाही. त्यानंतर १९ सप्टेबर २०११ रोजी धरणग्रस्तांनी कौलखेड येथे उपोषण केले. त्या उपोषणाची दखल घेवून प्रशासनाने सदर गावाचा अहवाल तयार करुन अधिक्षक अभियंता, वाशीम पाटबंधारे मंडळ यांना पाठविला. या अहवालानुसार, पुनर्वसीत गाव कौलखेड येथील शाळेचे व पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दजार्चे झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. तसेच गावाकडे जाणार्या रस्त्याचेही काम निकृष्ट झाला असून या रस्त्यावर जातांना एक ते दोन फुट पाय फसत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. या गावातुन शाळेसाठी जाणार्या विद्यार्र्थ्यांना २किलोमिटर ऐवजी ९ किलोमीटर फेºयाने शाळेत जावे लागते. निकृष्ट रस्त्यामुळे शेतकरी शेतीत सुध्दा जावू शकत नाहीत. याबाबत २९ सप्टेंबर २०११ ला अधिक्षक यांनी दिलेल्या लेखी पत्रावर नमुद केले आहे की, गावठाणाचे पुनवर्सन करतांना प्रकल्पबाधीत शेतकर्यांना शासनाने कुठल्याच सुविधा पुरविल्या नाहीत. या समस्यांचे निवारण ३१ मे २०१२ पर्यत पुर्ण करण्याचे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभागाने उपोषणकर्त्यांना दिले होते. तरी प्रकल्पातुन पुनर्वसीत झालेले गावठाणा मौजे कौलखेड येथे पाणीपुवठा, शाळा इमारत, समाजमंदिर, रस्ते, स्मशानभूमी, बाधित व्यक्तीच्या शेतीकडे जाणारे मार्ग, सार्वजनिक शौचालय व उघडी गटारे आदी विकास कामे येत्या १६ जानेवारी २०१८ पर्यत तात्काळ सुरु करण्याची मागणी धरणग्रस्तांनी केली असून कामे सुरु न झाल्यास येत्या बुधवार, १७ जानेवारी २०१८ रोजी कौलखेड वढव ग्रामपंचायत पदाधिकारी व धरणग्रस्तांच्या वतीने लघु पाटबंधारे कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येईल. असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.