वाशिम: संगणक साक्षरता दिनानिमित्त संगणक वापर जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 02:50 PM2017-12-02T14:50:50+5:302017-12-02T14:52:54+5:30
वाशिम: जागतिक संगणक साक्षरता दिनानिमित्त स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूलमध्ये आयटी क्लबच्यावतीने २ डिसेंबर रोजी संगणक वापराबाबत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.
वाशिम: जागतिक संगणक साक्षरता दिनानिमित्त स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूलमध्ये आयटी क्लबच्यावतीने २ डिसेंबर रोजी संगणक वापराबाबत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.
माहिती तंत्रज्ञानाच्या डिजिटल युगात माहिती संकलनासाठी विवीध उपकरणे वापरत असताना योग्य ती खबरदारी घेऊन संगणकाचा वापर मुल्याधिष्टीत व्हावा असे प्रतिपादन शाळेच्या प्राचार्य मिना उबगडे यांनी यावेळी केले. दरम्यान नाण्यांचा दोन बाजुप्रमाणे प्रत्येक घटकाला चांगली आणि वाईट अशा दोन बाजु असून कुठलेही तंत्रज्ञान स्वत:हुन विघातक असु शकत नाही अशी प्रतिक्रीया प्रमोद खासभागे यांनी दीली. दरम्यान आय टीक्लबच्या विद्यार्थ्यांनी सायबर जागृती, संगणक आणि मानवी मुल्य यावर आधारीत पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन सादर करून आधुनिक युगात संगणक शिकण्यासोबतच ते योग्य रीतीने वापरण्यासंदर्भात आपल्या सादरीकरणातुन माहिती दीली. सायबर जगतामध्ये उद्भवणारे धोके लक्षात घेता आय टी क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व समाजाला संगणकाच्या आणि आंतरजाल संबंधित योग्य वापराची माहिती होण्यासाठी आय टी क्लब ही संकल्पना महत्वाची वाटते असे मत आय टी शिक्षक व आय टी क्लबचे विभाग प्रमुख राम धनगर यांनी व्यक्त केले. दरम्यान आयटी क्लबचे अध्यक्ष आदित्य गावंडे, उपाध्यक्ष सानिका इंगळे, सहसचिव श्रेया कंदोई, जंसंपर्क प्रमुख नेहा गोरे, माध्यम प्रमुख सई लहाने व सदस्य कल्याणी काटकर ,आदित्य घुगे ,ऋतूजा वानखेडे, मानसी वानखेडे आणि पुर्वा अग्रवाल यांनी संगणक जागृतीवर आपले पीपीटी सादरीकरण केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक संजय दळवी, युवराज कुसळकर, संदीप बोदडे सर, स्मिता पाटील,स्वाती बोदडे यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्राचार्य मिना उबगडे आणि पर्यवेक्षिका प्रनिता हरसुले यांच्या मार्गदर्शनाखाली आय टी शिक्षक राम धनगर यांनी केले सुत्र संचालन श्रेया कंदोई तर आभार शिक्षक संजय दळवी यांनी मानले कार्यक्रमाला शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती