Washim: बाजार समिती निवडणूक: वाशिम मतमाेजणी केंद्रावर गर्दी, १८ पैकी ११ जागांचा निकाल जाहीर
By नंदकिशोर नारे | Published: April 29, 2023 12:18 PM2023-04-29T12:18:12+5:302023-04-29T12:18:36+5:30
Washim News: वाशिम जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांपैकी वाशिम आणि मानोरा या दोन कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवार २८ एप्रिल रोजी मतदान झाले. शनिवार, २९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजतापासून वाशिम मतमोजणीला प्रारंभ झाला.
- नंदकिशाेर नारे
वाशिम - जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांपैकी वाशिम आणि मानोरा या दोन कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवार २८ एप्रिल रोजी मतदान झाले. शनिवार, २९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजतापासून वाशिम मतमोजणीला प्रारंभ झाला. या मतमाेजणी केंद्रावर एकच गर्दी दिसून येत आहे. निकाल लागल्याबराेबर उमेदवाराच्या कार्यकर्ते जल्लाेष करताना दिसून येत आहेत.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ५८ उमेदवार रिंगणात होते. यात वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत २७०८ मतदारांपैकी २६४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वाशिम बाजार समितीत सकाळी १२:०० वाजेपर्यंत जाहिर झालेल्या निकालानुसार १८ पैकी ११ जागांचा निकाल घाेषित करण्यात आला हाेता. यामध्ये राष्ट्रवादी काॅग्रेस २, काॅंग्रेस ४, शिंदे गट १, वंचित २, शिवसेना ठाकरे गट २ या उमेदवारांचा समावेश आहे. निकाल लागल्याबराेबर मतदान केंद्रावर एकच जल्लाेष हाेताना दिसून येत आहे. ७ जागा निवडणूक निकालाची प्रतिक्षा मतदान केंद्राबाहेर नागरिक करतांना दिसून येत आहेत.