Washim: भाजपाची १२६ जणांची जम्बो वाशिम जिल्हा कार्यकारिणी जाहीर, महामंत्रीपदी चौघांची वर्णी
By संतोष वानखडे | Published: October 3, 2023 02:40 PM2023-10-03T14:40:28+5:302023-10-03T14:41:49+5:30
Washim BJP News: भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शाम बढे यांनी जिल्हयाची १२५ जणांची जम्बो कार्यकारीणी मंगळवारी जाहीर केली आहे.
- संतोष वानखडे
वाशिम : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शाम बढे यांनी जिल्हयाची १२५ जणांची जम्बो कार्यकारीणी मंगळवारी (दि.३) जाहीर केली आहे.
यामध्ये ४ महामंत्री, ११ उपाध्यक्ष, १० सचिव, १ कोषाध्यक्ष, १ प्रसिध्दी प्रमुख, ७ मोर्चा व आघाडयांचे जिल्हाध्यक्ष, २७ प्रकोष्ठांचे जिल्हा संयोजक व ६४ कार्यकारीणी सदस्यांचा समावेश आहे.
महामंत्री नागेश घोपे, प्रा.सुनिल काळे यांची फेरनिवड झाली आहे तर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गजानन लाटे व हेमलता लहुटे यांची नव्याने महामंत्री पदी वर्णी लागली आहे. गत तिन महीन्यांपुर्वी भारतीय जनता पार्टीने जिल्हा परिषद सदस्य शाम बढे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपविली होती. तेंव्हापासुनच जिल्हावासियांना नव्या जिल्हा कार्यकारीणीची प्रतिक्षा लागली होती, अखेर मंगळवारी ही प्रतिक्षा संपली. जिल्हाध्यक्ष बढे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश महामंत्री आमदार रणधीर सावरकर, विभागीय संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, जिल्हा प्रभारी तथा प्रदेश सचिव सुरेश बनकर तथा मावळते जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मान्यतेने १२६ पदाधिकाऱ्यांची जिल्हा कार्यकारीणी घोषीत केली. यामध्ये उपाध्यक्षपदावर उमेश ठाकरे, जितेंद्र महाराज राठोड, विजय पाटील, अनिल कानकिरड, धनंजय हेंद्रे, मो.इमदाद मो. अफसर, अशोकराव सानप ,संतोष मवाळ, सुनिता पाटील, सुनिल राजे व सुनिल चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. सचिवपदी करूणाताई कल्ले, श्रीकृष्ण मुंदे, शरद चव्हाण, प्रकाश राठोड, प्रिया प्रविण ठाकरे, प्रदिप देशमुख, मेघाताई बांडे, सिध्देश्वर केळे, रेखाताई खंडागळे, अंजली पाठक तर कोषाध्यक्षपदी मिठुलाल शर्मा यांची पुन्हा एकदा वर्णी लागली असुन प्रसिध्दीप्रमुख पदाची जवाबदारी जिया अताउल्ला खान यांचेकडे सोपविण्यात आली.
सात मोर्चांचे जिल्हाध्यक्षही जाहिर
युवा मोर्चा - अमोल भुतेकर
महिला मोर्चा -मायाताई वाघमारे,
किसान मोर्चा -गंगादिप राउत
ओबिसी मोर्चा संतोष मुरकुटे
अनु. जाती मोर्चा - रिषभ बाजड,
अनु. जमाती मोर्चा - चिंतामण खुळे
अल्पंख्यांक मोर्चा - मो.शारीक मो. नाजिम
८ मंडळाचे अध्यक्ष जाहीर
जिल्हयातील ९ पैकी ८ मंडळाचे अध्यक्ष जाहीर केले. वाशिम शहर संतोष शिंदे, वाशिम ग्रामिण प्रल्हाद गोरे, मंगरूळपीर शहर सतिष हिवरकर, ग्रामिण प्रा.हरीदास ठाकरे, कारंजा शहर ललीत चांडक, ग्रामिण डॉ. राजिव काळे, मानोरा ठाकुरसिंग चव्हाण तर रिसोड मंडळाच्या अध्यक्षपदी स्वप्नील सरनाईक यांची निवड करण्यात आली.