वाशिम : ‘त्या’ वृद्ध महिलेचा खून; पतीस अटक; गुन्हा दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 02:32 AM2018-01-05T02:32:23+5:302018-01-05T02:33:27+5:30

वाशिम : शहरातील बिलाल नगर परिसरात एका वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारला संध्याकाळी घडली होती. मृत महिलेचा मुलगा शे. सलीम शे. हकीम याच्या फिर्यादीहून मृत महिलेचा पती शे. हकीम शे. लाल याचेविरूद्ध गुरूवारला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

Washim: 'That' the blood of an old woman; 25 arrested; Filing a complaint! | वाशिम : ‘त्या’ वृद्ध महिलेचा खून; पतीस अटक; गुन्हा दाखल!

वाशिम : ‘त्या’ वृद्ध महिलेचा खून; पतीस अटक; गुन्हा दाखल!

Next
ठळक मुद्दे पती शे. हकीम शे. लाल याचेविरूद्ध गुरूवारला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरातील बिलाल नगर परिसरात एका वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारला संध्याकाळी घडली होती. मृत महिलेचा मुलगा शे. सलीम शे. हकीम याच्या फिर्यादीहून मृत महिलेचा पती शे. हकीम शे. लाल याचेविरूद्ध गुरूवारला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 
प्राप्त माहितीनुसार, बिलाल नगर परिसरात शे. हकीम शे. लाल (वय ६५) व त्यांच्या पत्नी तजमुनबी शेख हकिम (वय ६0) हे दोघे एकत्र राहत होते. संध्याकाळी त्यांचा मुलगा शे. सलीम शे. हकीम हा आईला भेटायला गेला असता त्याची आई तजमुनबी शेख हकीम या घरातील पलंगाजवळ मृत अवस्थेत आढळून आल्या होत्या. त्यांच्या चेहर्‍यावर रक्ताचे डाग आढळून आल्याने त्यांच्या मुलांनी बुधवारलाच घातपाताची शक्यता वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांकडे व्यक्त केली होती. 
विशेष म्हणजे घटना घडल्यापासून मृत महिलेचा पती शे. हकीम शे. लाल याने आपला मोबाइल बंद ठेवून तो वाशिममधून पसार झाला आहे. अद्यापही तो घरी परतला नसल्याचे कुटुंबीयांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या तपास अधिकार्‍यांना सांगितले.
या घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये मृत महिलेचा मुलगा शे. सलीम याने फिर्याद नोंदविली. आपल्या आईची हत्या वडील शे. हकीम यांनी केल्याचा त्याने आरोप केला आहे. मुलाच्या फिर्यादीहून पोलिसांनी शे. हकीम याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे करीत आहेत. 
 

Web Title: Washim: 'That' the blood of an old woman; 25 arrested; Filing a complaint!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.