वाशिम : बस पंक्चर, दीड तास खोळंब्याचा प्रवाशांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 07:10 PM2017-12-17T19:10:41+5:302017-12-17T19:11:36+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या मंगरुळपीर आगाराची अनसिंग-मंगरुळपीर ही बस पंक्चर झाल्यानंतर दुसरी बस येण्यास दीड तासाच्या जवळपास वेळ लागल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. हा प्रकार मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया शिवणी दलेलपूरनजिक रविवारी दुपारच्या सुमारास घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्य परिवहन महामंडळाच्या मंगरुळपीर आगाराची अनसिंग-मंगरुळपीर ही बस पंक्चर झाल्यानंतर दुसरी बस येण्यास दीड तासाच्या जवळपास वेळ लागल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. हा प्रकार मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया शिवणी दलेलपूरनजिक रविवारी दुपारच्या सुमारास घडला.
राज्य परिवहन महामंडळाच अनेक बसगाड्या भंगार झाल्या आहेत. त्याचा फटका प्रवाशांना वारंवार सहन करावा लागत आहे. असाच प्रकार मंगरुळपीर तालुक्यातील अनसिंग-मंगरुळपीर ा बसफेरीबाबतही रविवारी घडला. अनसिंग-मंगरुळपीर मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसगाड्या दिवसभर धावत असतात. यापैकी मंगरुळपीर आगाराची एमएच-४० ८६०४ क्रमांकाची बस शिवणी दलेलपूरनजिक पंक्चर झाली. त्यामुळे वाहकाने आगार प्रशासनाला माहिती देऊन दुसरी बस बोलावली; परंतु ही बस येण्यास दीड तासाच्या जवळपास विलंब लागला. त्यामुळे आवश्यक कामांसाठी प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना त्याचा फटका बसला. या बसमध्ये प्रामुख्याने महिला, बालके आणि वृद्ध प्रवाशांचा समावेश असल्याचे दिसले. पविहन महामंडळाच्या बसगाड्यांची दशा वाईट असल्याने बहुतांश बसगाड्या रस्त्यातच बंद पडतात आणि त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागतो. तथापि, रस्त्यावर पडलेले खड्डे आणि खडीमुळे ही बस पंक्चर झाल्याचे वाहक आणि चालकाकडून सांगण्यात आले. एकिकडे परिवहन महामंडळ सतत प्रवासभाड्यात वाढ करून कोट्यवधीचे उत्पन्न घेत असताना प्रवाशांसाठी मात्र सुसज्ज अशा बसगाड्या उपलब्ध केल्या जात नाहित. परिवहन महामंडळाने प्रवाशांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन चांगल्या बसगाड्या उपलब्ध कराव्यात, अशी मागणी या बसमधील प्रवाशांनी यावेळी केली.