Washim: स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर कार धडकली; एकाचा मृत्यू, चार जण गंभीर
By संतोष वानखडे | Published: October 14, 2023 07:32 PM2023-10-14T19:32:25+5:302023-10-14T19:32:46+5:30
Accident: झाशी राणी चौक कारंजा बायपास येथून भरधाव जाणारी कार थेट स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर धडकल्याने या अपघातात एक ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना १४ ऑक्टोंबर रोजी कारंजा शहरात घडली.
- संतोष वानखडे
वाशिम - झाशी राणी चौक कारंजा बायपास येथून भरधाव जाणारी कार थेट स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर धडकल्याने या अपघातात एक ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना १४ ऑक्टोंबर रोजी कारंजा शहरात घडली. मुनीर खा मजीत खा (४२) रा. कारंजा असे मृतकाचे नाव आहे.
एमएच ०५ एझेड २६५१ क्रमांकाची कार झाशी राणी चौकातून कारंजा बस स्टँडकडे जात होते. दरम्यान, रस्त्यात असणाऱ्या हिंदू स्मशानभूमी जवळ असणाऱ्या झाडाखाली बसलेल्या चार ते पाच जणांना कट मारून ही कार थेट विद्युत खांबाला धडकली आणि स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर आदळली. अपघाताची माहिती तात्काळ १०२ चे पायलट राजू राठोड यांनी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून जखमी रुग्णांना कारंजा उप जिल्हा रुग्णालयत भरती केले. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात (राजू) उर्फ़ मुनीर खा मजीत खा (४२) रा. कारंजा यांचा जागीच मृत्यू झाला. अथर्व दहातोंडे (२३), नाजमुद्दीन काजीमुद्दीन (५२), शमीउल्ला खा किफायतखा (५५) रा. काजीपुरा कारंजा या गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अमरावतीला रेफर केले.