वाशिम: दिग्रस ते मानोरा रस्त्यावर चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 02:35 AM2018-03-06T02:35:32+5:302018-03-06T02:35:32+5:30

मानोरा : तालुक्याला गुलाबी बोंडअळीच्या अनुदानातून वगळल्यामुळे शिवसेना पक्षाच्यावतीने ५ मार्च रोजी दुपारी १ वाजता माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या नेतृत्वात दिग्रस चौकात रस्ता रोको आंदोलन करून शासनाला शेतक-यांच्या स्वाक्षरीचे निवेदन तहसीलदार यांच्या माध्यमातून देण्यात आले.

Washim: Chakka Jam on Degres to Manora Road | वाशिम: दिग्रस ते मानोरा रस्त्यावर चक्का जाम

वाशिम: दिग्रस ते मानोरा रस्त्यावर चक्का जाम

Next
ठळक मुद्देशेतक-यांसाठी डहाके रस्त्यावर

 लोकमत न्युज नेटवर्क
मानोरा : तालुक्याला गुलाबी बोंडअळीच्या अनुदानातून वगळल्यामुळे शिवसेना पक्षाच्यावतीने ५ मार्च रोजी दुपारी १ वाजता माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या नेतृत्वात दिग्रस चौकात रस्ता रोको आंदोलन करून शासनाला शेतक-यांच्या स्वाक्षरीचे निवेदन तहसीलदार यांच्या माध्यमातून देण्यात आले.
 २०१७ च्या खरीप हंगामात कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीने आक्रमण करून पिकाचे नुकसान केले. यामुळे  महसूल प्रशासनाने सर्वेक्षण करून शासनाकडे अहवाल पाठविला. शासनाने मदत जाहीर केली. शेतकरी बांधवांना मदत मिळेल या आशेवर असताना शासनाने गेल्या पाच वर्षांचा शेतकºयांचा नुकसान भरपाईची सरासरी काढून ज्या शेतकºयाचे सरासरी ३३ टक्के नुकसान झाले, अशा शेतकºयांनाच गुलाबी बोंडअळीचे नुकसान मिळणार, असा जी.आर. शासनाने २८ फेबु्रवारी रोजी काढला. या शासनाच्या या दुटप्पी धोरणाचा निषेध करण्यासाठी व जाचक अटीचा जी.आर परत घेऊन शेतकºयानां तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, यासाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य गजानन अमदाबादकर, उष्मान गारवे, सहकार नेते सुरेश गावंडे, रवी पवार, प्रकाश डहाके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर माजी आ.प्रकाश डहाके, जि.प. सदस्य  गजानन अमदाबादकर, उश्मान गारवे, सहकार नेते सुरेश गावंडे, माजी सभापती अशोक देशमुख,  शिवसेना ता.प्र. रवी पवार, शहर प्रमुख राजू देशमुख,  बाजार समितीचे  संचालक राजेश नेमाणे,  राम राठोड, राजू पाटील, विकास चौधरी, मोतीराम ठाकरे, डॉ. रामराव राठोड, वीरू राठोड, विनोद अप्पाघाटरे,  डॉ.दीपक पाटील, भगवान देशमुख, मन्साराम  राठोड, माजी जि.प. सदस्य भाऊ नाईक, सुदाम पवार, चंद्रकांत राठोडसह  शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुमारे १ तास वाहतूक सेवा ठप्प झाली होती. ठाणेदार रामकृष्ण मळघने यांनी यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Washim: Chakka Jam on Degres to Manora Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम