वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील बालविवाह रोखला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:37 AM2018-03-13T01:37:35+5:302018-03-13T01:37:35+5:30
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील मजलापूर येथील एका १५ वर्षीय मुलीचा १२ मार्च रोजी होत असलेला विवाह महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे रोखला गेला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांच्यासह मंगरूळपीरचे सहायक पोलीस निरीक्षक ए. के. कांबळे, ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंध अधिकारी दीपाली वाकोडे यांनी मुलीच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून, मुलीचा बालविवाह न करण्याचे हमीपत्र घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क

सोमवारी सकाळी मजलापूर येथे बालविवाह होत असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राठोड यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ मजलापूरच्या ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंध अधिकारी वाकोडे यांना याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस प्रशासनालाही याबाबत माहिती देण्यात आली. सुभाष राठोड, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी दिलीप राठोड व कर्मचारी यांनी मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी माहिती देऊन, बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्याचे सांगितले. यावेळी राठोड यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना कुठेही बालविवाह घडत असल्यास चाइल्ड लाइनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन केले. तसेच बालविवाह केल्यास संबंधितांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.