वाशिम शहरात सात दिवसात एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 04:15 PM2020-11-08T16:15:17+5:302020-11-08T16:15:44+5:30

CoronaVirus News वाशिम शहरात या सात दिवसात नव्याने एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही.

Washim city has not had a single corona positive in seven days! | वाशिम शहरात सात दिवसात एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही !

वाशिम शहरात सात दिवसात एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा आलेख आणखी घसरला असून, वाशिम शहरात या सात दिवसात नव्याने एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. ही बाब शहरवासियांसाठी तुर्तास तरी दिलासादायक ठरत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी यापुढेही सतर्क राहावे, असे आवाहन आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने केले.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरात जून महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. सप्टेंबर महिन्यापर्यंत शहरात कोरोनाचा उद्रेक झाला.
वाशिम शहरात जवळपास १८०० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने शहरवासियांची चिंता वाढली होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सप्टेंबर महिन्यात व्यापाऱ्यांनी सात दिवस जनता कर्फ्यूही पाळला होता. दरम्यान आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा आलेख घसरला. नोव्हेंबर महिना तुर्तास तरी शहरवासियांसाठी दिलासादायक ठरत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या सात दिवसात शहरात नव्याने एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. या दरम्यान कोरोनामुळे एकही मृत्यू नसल्याने शहरवासियांची चिंता बºयाच अंशी कमी होत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आगामी दिवाळी सण लक्षात घेता घराबाहेर पडताना नेहमी मास्क किंवा रुमालचा वापर करावा, हात वारंवार स्वच्छ धुवावे, नियमित व्यायाम करावा, असे आवाहन आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने केले.
दरम्यान,आगामी दिवाळी सण लक्षात घेता वाशिम येथील बाजारपेठ गजबजली आहे. कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यता गृहित धरता नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये, दुकानात एकाच वेळी पाच पेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये, दुकानात तापमापक व सॅनिटायझर ठेवण्यात यावे, या सूचनांची दुकानदारांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीदेखील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.

 

 

Web Title: Washim city has not had a single corona positive in seven days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.