वाशिम शहराची दिवसभर ‘बत्ती गूल’!
By Admin | Published: October 24, 2016 02:32 AM2016-10-24T02:32:03+5:302016-10-24T02:32:03+5:30
३३ के.व्ही. उपकेंद्रातील दुरुस्ती कामांमुळे वीज पुरवठा खंडीत झाला.
वाशिम, दि. २३- शहरातील अधिकांश भागात विद्युत पुरवठा करणार्या पुसद ना क्यावरील ३३ के.व्ही. उपकेंद्रातील कंडक्टर बदलण्याचे काम करण्यात आले. यामुळे मात्र रविवार, २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंंंत विद्युत पुरवठा खंडित होता. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
वाशिम शहरातील पुसद नाका परिसरात असलेल्या ३३ के.व्ही. विद्युत उपकेंद्राला सुमारे ३0 वर्ष पूर्ण होत आहेत. अशातच उपकेंद्रातील बस बार (कंडक्टर) नादुरुस्त झाल्याने तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन महावितरणने रविवारी कंडक्टर बदलण्याची कार्यवाही केली. त्यामुळेच दिवसभर विद्युत पुरवठा खंडित ठेवावा लागला, अशी माहिती कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांनी दिली. तथापि, ही महत्त्वाची समस्या निकाली निघाल्यामुळे आता आगामी २0 वर्षे देखील विद्युत उपकेंद्रातील कंडक्टर बदलावा लागणार नाही, असेही देवकर यांनी सांगितले.