वाशिम : संचारबंदी, जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:37 AM2020-03-24T11:37:00+5:302020-03-24T11:37:09+5:30

पुढील आदेशापर्यंत सीमा बंदी कायम राहणार आहे.

Washim: Communication block, all borders of the district closed | वाशिम : संचारबंदी, जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद

वाशिम : संचारबंदी, जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांचा कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वाशिम जिल्ह्याच्या सर्व सीमा तत्काळ बंद करण्याचे तसेच जिल्ह्यात संचारबंदी लागु करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी २३ मार्च रोजी सायंकाळी दिले. जिल्ह्याचा रहिवासी नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक कारणांशिवाय प्रवेश दिला जाणार नाही तसेच जिल्ह्यातील नागरिकांनाही जिल्ह्याबाहेर जाण्यास मनाई केली असून, पुढील आदेशापर्यंत सीमा बंदी कायम राहणार आहे.
राज्यात नोवेल कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण जिल्ह्यात नाही. तथापि, सावधगिरी आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकारी मोडक यांनी २३ मार्च रोजी सीमा बंदीचा आदेश जारी केला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील किराणा, अन्नधान्य, फळे व भाजीपाला, दुध, औषधे, दूरसंचार, विद्युत, पिण्याचे पाणी विक्री करणारी दुकाने, बँक व पेट्रोलपंप आदी जीवनावश्यक सेवा वगळता संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने १०० टक्के बंद राहतील. जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद राहतील. आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आदेशात नमूद आहे. बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्ती, प्रवाशांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे २३ मार्च २०२० पासून वाशिम जिल्ह्याच्या सर्व सीमा तत्काळ बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची, पेट्रोलियम पदार्थ, दुध, भाजीपाला, औषधी, धान्य, वैद्यकीय उपकरणे इत्यादींची वाहतूक वगळता जिल्ह्यात येणारी व जिल्ह्यातून जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे.सर्व सीमांची नाकाबंदी करण्यात येणार आहे. पुढील आदेशापर्यंत जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार आहेत. या आदेशाचे पालन न करणाºया कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले. सदर आदेश धडकताच सायंकाळी स्थानिक पाटणी चौकस्थित बाजारातील गर्दी कमी केली.

Web Title: Washim: Communication block, all borders of the district closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.