वाशिम : पेट्रोल पंपाच्या आवारातच कंटनेरने घेतला पेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 10:45 PM2018-03-30T22:45:52+5:302018-03-30T22:45:52+5:30

मालेगाव (वाशिम): स्थानिक नागरतास बायपासवरील अग्रवाल पेट्रोलपंपाच्या परिसरात उभ्या असलेल्या एका कंटेनरने ३० मार्च रोजी दुपारच्या सुमारास अचानक पेट घेतला.  आग विझविण्यासाठी पेट्रोलपंपावरील अग्नीरोधक साहित्याचा वापर करण्यात आला. वेळीच आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

Washim: Container burn in the premises of Petrol Pump! | वाशिम : पेट्रोल पंपाच्या आवारातच कंटनेरने घेतला पेट!

वाशिम : पेट्रोल पंपाच्या आवारातच कंटनेरने घेतला पेट!

Next
ठळक मुद्देमालेगाव येथील घटना अनर्थ टळला

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम): स्थानिक नागरतास बायपासवरील अग्रवाल पेट्रोलपंपाच्या परिसरात उभ्या असलेल्या एका कंटेनरने ३० मार्च रोजी दुपारच्या सुमारास अचानक पेट घेतला.  आग विझविण्यासाठी पेट्रोलपंपावरील अग्नीरोधक साहित्याचा वापर करण्यात आला. वेळीच आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. हा कंटेनर पेट्रोलच्या टाकीपासून थोड्या अंतरावर उभा होता. 
जी.जे. १२ ए.झेड ४४२९ क्रमांकाचा कंटेनर हा विशाखापटटनम येथून अहमदाबादकडे जाणार होता. ३० मार्च २०१८ रोजी दुपारी थोडा आराम करण्यासाठी कंटेनर चालकाने आपले वाहन नागतास बायपासवरील अग्रवाल पेट्रोलपंपावर परिसरात उभा केला. प्रचंड ऊन असल्यामुळे त्यामधील बॅटरीचा शॉर्टसर्कीट झाला आणि कंटेनरने अचानक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच पंपावरील कर्मचारी व तेथे असलेले इतर ट्रकचे चालक धावत कंटेनर जवळ आले आणि आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. उपलब्ध असलेले पाणी व आग विझविण्याचे साहित्य यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. वाशिम येथून अग्नीशामक दलाला पाचारण केले होते. मात्र, सदर गाडी येईपर्यंत आग विझविण्यात आली होती.

Web Title: Washim: Container burn in the premises of Petrol Pump!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.