आईला मारहाण करून पप्पांनी तिला झोक्याला बांधले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 04:52 AM2018-05-27T04:52:18+5:302018-05-27T04:52:18+5:30

‘आधी गालात झापडा मारून त्यानंतर माझ्या आईला पप्पांनीच झोक्याला बांधले’, असा जबाब अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याने दिल्याने तिच्या आईने आत्महत्या केली नसून वडिलांनीच हत्या केल्याचा गुन्हा नोंदवून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Washim Crime News | आईला मारहाण करून पप्पांनी तिला झोक्याला बांधले!

आईला मारहाण करून पप्पांनी तिला झोक्याला बांधले!

googlenewsNext

शिरपूर जैन (वाशिम) - ‘आधी गालात झापडा मारून त्यानंतर माझ्या आईला पप्पांनीच झोक्याला बांधले’, असा जबाब अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याने दिल्याने तिच्या आईने आत्महत्या केली नसून वडिलांनीच हत्या केल्याचा गुन्हा नोंदवून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
२४ मे २०१८ रोजी घडलेल्या या घटनेची अधिक माहिती अशी, की शिरपूर येथील जगन्नाथ काठोळे यांची मुलगी सुनिता हिचा विवाह ५ वर्षांपूर्वी भापुर (ता.रिसोड) येथील धनंजय बोडखे याच्याशी झाला होता. दरम्यानच्या काळात या दाम्पत्यास तीन गोंडस मुली झाल्या. मात्र, ‘तुझ्या पोटी मुलीच का जन्माला येतात’, असा प्रश्न वारंवार करून सुनिताचा पती धनंजय हा तिला नेहमीच मारहाण करून त्रास द्यायचा. त्यामुळे सुनिताच्या वडिलांनी तिला कुटुंबासह शिरपूरमध्ये वास्तव्यास आणले. ते राहत असलेल्या भाड्याच्या घरातच सुनिताचा मृतदेह झोक्याला गळफास लागलेल्या स्थितीत आढळून आला. दरम्यान, ही आत्महत्या नसून धनंजयनेच माझ्या मुलीची हत्या केल्याची तक्रार सुनिताचे वडील जगन्नाथ काठोळे यांनी पोलिसांत दिली. त्यामुळे पोलिसांनी चिमुकल्या श्रद्धाचा जबाब घेतला. आता धनंजयविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
आज आई या जगात नाही. तिला मारणारा बापही कारागृहात जाईल. त्यामुळे श्रद्धासह अडीच वर्षे वयाची सलोनी आणि सहा महिने वयाची आराध्या अशा तीघी बहिणी माय-बापाच्या प्रेमाला मुकणार आहेत.

‘तुझ्या पोटी मुलीच का जन्माला येतात’, असा प्रश्न वारंवार करून सुनिताचा पती धनंजय हा तिला नेहमीच मारहाण करून त्रास द्यायचा. त्यामुळे सुनिताच्या वडिलांनी तिला कुटुंबासह शिरपूरमध्ये वास्तव्यास आणले. ते राहत असलेल्याघरातच सुनिताचा मृतदेह आढळून आला.

Web Title: Washim Crime News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.