वाशिम : रक्कम काढण्यासाठी बँकेत पहाटेपासूनच ग्राहकांच्या ‘रांगा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 11:20 AM2020-04-18T11:20:10+5:302020-04-18T11:20:18+5:30
नागरिकांच्यावतिने जिल्ह्यातील सर्वच बँकांसमोर एकच गर्दी केल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी कोराना बाधित रूग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्यावतीने ग्रामीण तसेच शहरी भागात नागरिकांची गर्दी होउ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे. तथापि, अनेक नागरिक अद्याप कोरोना विषाणू संसर्गाबद्दल गंभीर नसल्याने बँकांसमोरील गर्दी हटता हटेना अशी स्थिती वाशिम शहरासह ग्रामीण भागात कायम आहे. सद्यस्थितीत तर पहाटेपासूनच ग्राहक रांगेत उभे राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून राज्यात संचारबंदी लागू केली आहे. शासनाच्या विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम, उज्ज्वला योजनेतील सिलिंडर आणि जनधनच्या खात्यात जमा झालेली रक्कम काढण्यासाठी महिला, शेतकरी आणि सर्वसाधारण नागरिकांच्यावतिने जिल्ह्यातील सर्वच बँकांसमोर एकच गर्दी केल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग हा एकापासून दुसºयाला होत असल्याने नागरिकांनी गर्दी करू नये तसेच विशिष्ट अंतर ठेवून एकमेकांपासून दूर राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने वारंवार केले. परंतू, नागरिकांनी सदर आवाहन गांभीर्याने घेतले नसल्याचे बँकेसमोर गर्दीवरून दिसून येते. विशेष म्हणजे अनेक बँकासमोर गर्दी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होतांना दिसून येत नाहीच. पहाटे ६ वाजतापासून शहरातील बँकेमध्ये रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. लवकर आल्यानंतर पाहिला क्रमांक आपला लागावा या उद्देशाने ग्राहक पहाटे हजर राहणत असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत बँकेची वेळ ही सकाळी ८ ते दुपारी १२ वाजता आहे. याकरिता ग्राहक मात्र सकाळी ६ वाजापासून रांगा लावताना दिसून येत आहे. १८ एप्रिलपासून बँकेची वेळ ८ ते दुपारी दोन करण्यात आली आहे.
गर्दी न करण्याच्या आवाहनाला ‘खो’!
कोरोना विषाणुला हद्दपार करायचे असेल तर यावर केवळ एकमेव रामबाण उपाय म्हणजे गर्दी करु नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये हा आहे. असे असले तरी नागरिका रस्तयावर अत्यावश्यक कामे नसताना सुध्०ा फिरतांना दिसून येत आहे. ात्यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतिने गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु या आवाहनाला नागरिकांनी केराची टोपली दाखविली असे म्हटल्या वावगे ठरु नये. शहरातील गर्दी कमी करायची असल्याने प्रशाासनाच्यावतिने विशेष पास उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आवाहनानुसार कार्य करण्याचे कळविण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाच्यावतिने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपले व आपल्या शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवा. कुठेही विनाकारण गर्दी करु नये, तोंडाला मास्क वापरावा. गर्दी होणार नाही याकरिता भाजीबाजार, मेडिकल व बँकेसमोर पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. त्यांना सहकार्य करा. गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
- वसंत परदेसी
पोलीस अधीक्षक , वाश्मिा