वाशिम : गारपिटीच्या तडाख्याने महागाव येथील वृद्ध महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 07:48 PM2018-02-11T19:48:36+5:302018-02-11T19:53:34+5:30
महागाव (वाशिम) : तालुक्यातील महागाव येथील यमुनाबाई रामभाऊ हुंबाड (वय ७५ वर्षे) ही महिला गावातील गोपालेश्वर महाराज मंदिरातून दर्शन घेवून घरी परतत असताना जोरदार पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात सापडली. यात तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ११ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क

याबाबत प्राप्त माहितीनुसार, महागाव येथील यमुनाबाई नित्यनेमाप्रमाणे सकाळी सात वाजताच्या सुमारास गावातच असलेल्या गोपालेश्वर महाराजांच्या मंदिरात दर्शनाकरिता गेल्या होत्या. दर्शन करून घरी परतत असताना अचानक विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पाऊस सुरू झाला. अशातच गारपीट देखील झाली. तब्बल सात ते आठ मिनीट सुरू असलेल्या या नैसर्गिक आपत्तीत यमुनाबाई पुरत्या अडकल्या. त्यांना गार आणि पावसाचा जबर मार लागल्यानेच त्यांचा मृत्यू झाला, असे महागावच्या तलाठ्यांनी पंचनाम्यात नमूद केले आहे. यमुनाबाई यांच्या कुटुंबात कुणाच्याही नावे शेती नाही. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि दोन मुली आहेत. दरम्यान, आमदार अमित झनक, तहसिलदार राजू सुरडकर, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर, रिसोड पंचायत समितीचे उपसभापती महादेव ठाकरे, मंडळ अधिकारी देशपांडे, तलाठी देव्हढे आदिंनी घटनास्थळ व मृतक यमुनाबाई हुंबाड यांच्या कुटुंबियाची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. सदर घटनेचा सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.