वाशिम : इतर मागासवर्ग महामंडळाची कर्जदारांकडे २६४ कोटींची थकबाकी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 07:19 PM2018-01-02T19:19:08+5:302018-01-02T19:27:19+5:30
वाशिम: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय, वाशिम यांच्यामार्फत विविध कर्ज योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४६३ लाभार्थ्यांना कर्ज वितरित करण्यात आले. संबंधितांकडे आजमितीस २६४.८२ कोटी रुपयांची रक्कम थकीत असून ३१ मार्चपर्यंत लाभार्थींनी कर्ज भरणा केल्यास त्यांना २ टक्के व्याज सवलत दिली जाईल, अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक ग.ह.शेंडे यांनी मंगळवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क

आर्थिकदृष्ट्या कमकुवत लाभार्थ्यांना इतर मागासवर्ग महामंडळाकडून स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. दरम्यान, थकबाकीदारांकडून दिवाणी दावे, फौजदारी खटले, महाराष्ट्र जमीन महसुल कायदा १९६६ मधील तरतुदीनुसार आर.आर.सी. आदींच्या माध्यमातून ही रक्कम वसुली करण्याबाबतचे निर्देश इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग विभागाच्या सचिवांनी दिले आहेत. त्यानुसार, महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून कायदेशिर कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू असून जिल्ह्यातील थकीत लाभार्थींनी याची नोंद घेवून ३१ मार्च २०१८ पर्यंत कर्जाचा भरणा करावा. संबंधितांना २ टक्के व्याज सवलत दिली जाईल. संबंधितांनी थकीत मुद्दल व व्याज रक्कम एकरकमी भरणा करून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.