वाशिम : बियाणे उत्पादन व वितरणाचे अनुदानसंदर्भात चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 06:32 PM2017-12-17T18:32:40+5:302017-12-17T18:34:08+5:30
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान तसेच कडधान्य व राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियानांतर्गत बिजोत्पादन करणाºया शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना बियाणे उत्पादन व वितरणाचे अनुदान मिळण्यासंदर्भात शेतकºयांनी रविवार, १७ डिसेंबर रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्या जनसंपर्क कार्यालयात चर्चा केली. शासनदरबारी हा प्रश्न मांडून अनुदानाचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही आमदार पाटणी यांनी शेतकºयांना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान तसेच कडधान्य व राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियानांतर्गत बिजोत्पादन करणाºया शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना बियाणे उत्पादन व वितरणाचे अनुदान मिळण्यासंदर्भात शेतकºयांनी रविवार, १७ डिसेंबर रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्या जनसंपर्क कार्यालयात चर्चा केली. शासनदरबारी हा प्रश्न मांडून अनुदानाचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही आमदार पाटणी यांनी शेतकºयांना दिली.
शेतक-यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाला चालना देण्यासाठी विविध शासकीय योजनेंतर्गत मूग, उडीद, तूर, हरभरा व सोयाबीन या पिकांच्या बियाणे उत्पादनास सहाय्य व बियाणे वितरण या बाबींसाठी गत काही वर्षांपासून शासनाकडून अनुदान दिले जाते. १७ मे २०१७ च्या आदेशानुसार शेतकरी उत्पादक गट, कंपन्या, मंडळे यांना बियाणे उत्पादन व वितरण या प्रणालीतून वगळले आहे. मात्र, सन २०१६-१७ या वर्षात बियाणे उत्पादन प्रक्रिया सुरू केलेल्या शेतकरी गट, उत्पादक कंपन्यांना २०१७ च्या हंगामात बियाणे उत्पादन व वितरण या बाबींचे अनुदान मिळणे क्रमप्राप्त आहे, हा मुद्दा घेऊन जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. बियाणे उत्पादनाची प्रक्रिया ही एका वर्षाअगोदर सुरू होते. सन २०१६-१७ मध्ये बिजोत्पादन केलेले बियाणे सन २०१७-१८ मध्ये तयार झाले आहे. त्यामुळे सन २०१७-१८ मध्ये तयार झालेले बियाण्यासाठीसुद्धा कृषी विभागामार्फत शेतकरी उत्पादक गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी उत्पादन व वितरणाचे अनुदान मिळावे, अशी मागणी उत्पादक गटाच्या शेतकºयांनी केली. लाखो रुपयांचे कर्ज काढून बियाणे उत्पादन प्रक्रियेत शेतकरी गट व उत्पादक कंपन्यांनी पाऊल टाकले आहे. शासनाच्या हा निर्णय येण्यापूर्वीच सन २०१६-१७ मध्ये शेतकºयांनी बियाणे उत्पादन प्रक्रिया सुरू केली होती. त्यामुळे किमान २०१६-१७ या वर्षामध्ये सुरू केलेल्या बियाणे उत्पादन प्रक्रियेंतर्गतच्या बियाणे उत्पादन व वितरण या बाबीला अनुदान देण्याची मागणी शेतकºयांनी केलेली आहे.
यासंदर्भात १७ डिसेंबर रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्याशी पंजाबराव अवचार, रवींद्र बोडखे, गजानन अवचार, शिवाजी भारती यांच्यासह अन्य शेतकºयांनी चर्चा केली. २०१६-१७ मध्ये खरिप व रब्बी हंगामातील बियाणे उत्पादन प्रक्रियेंतर्गतचे उत्पादन व वितरण अनुदान मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी शेतकºयांनी आमदार पाटणी यांच्याकडे केली. हा मुद्दा शासनस्तरावर मांडून अनुदानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू, अशी ग्वाही राजेंद्र पाटणी यांनी शेतकºयांना दिली.