यंदाचे पीककर्ज वाटप केवळ २५ टक्के!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 10:31 PM2017-08-21T22:31:48+5:302017-08-21T22:31:48+5:30

वाशिम जिल्ह्यातील स्थिती;  उद्दीष्ट ११५० कोटींचे; वाटप झाला २८५ कोटींचा.

washim distribution loan only 25 percent | यंदाचे पीककर्ज वाटप केवळ २५ टक्के!

यंदाचे पीककर्ज वाटप केवळ २५ टक्के!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : खरिप हंगामासाठी चालू वर्ष आगळेवेगळे ठरले असून बहुतांश शेतकºयांनी पीककर्जाकडे पाठ फिरवली आहे. यंदा प्रशासनाने दीड लाख शेतकºयांकरिता ११५० कोटी रुपये पीककर्ज वाटपाची तरतूद केलेली असताना सोमवार, २१ आॅगस्टपर्यंत त्यापैकी केवळ २८५ कोटी रुपयांचे कर्जवाटप (२५ टक्के) होवू शकल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेने दिली.
गतवर्षी जुलै २०१६ पर्यंत जिल्ह्यातील विविध बँकांनी शेतकºयांना ८९० कोटी रुपयांचे कर्जवाटप केले होते. ते प्रमाण यंदा अगदीच खालावले असून सर्व बँका मिळूनही केवळ २८५ कोटी रुपयेच कर्जवाटप करू शकल्या. त्यात सर्वाधिक कर्जवाटप जिल्हा मध्यवर्ती बँकेने केले असून या बँकेने जिल्ह्यातील ५० शेतकºयांना १९७ कोटी रुपये वाटप केले आहेत. त्याव्यतिरिक्त शेतकºयांना दरवर्षी पीककर्ज वाटप करणाºया उर्वरित २० बँकांचा आकडा १० शेतकºयांच्या आतच असल्याचे यासंदर्भातील अहवालावरून दिसून येत आहे.
तथापि, आता खरिप हंगाम बहुतांशी संपत आला असून कर्जवाटप प्रक्रियाही थांबल्याने कर्जवाटपाच्या आकडेवारीत यापुढे फारशी वाढ होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.


पीककर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्यासंदर्भात सर्वच पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र, त्यास सुरूवातीपासून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे यंदा कर्जमाफीचा निर्णय जाहीर होईपर्यंतही शेतकºयांनी जुने कर्ज अदा केले नाही आणि नव्याने कर्ज मिळण्यासाठी प्रयत्नही केले नाही.
- विजय नगराळे,
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, वाशिम

Web Title: washim distribution loan only 25 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.