वाशिम जिल्हा  : रोजगार मेळाव्यातून २४८ बेरोजगारांची प्राथमिक निवड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:56 PM2017-12-01T13:56:20+5:302017-12-01T14:02:02+5:30

कारंजा लाड : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व कारंजा येथील एस. एस. एस. के. आर. इन्नाणी महाविद्यालय, विद्याभारती एच. एस. सी. व्होकेशनल  कोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा येथे ३० नोव्हेंबर रोजी आयोजित रोजगार मेळाव्यात २४८ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

Washim District: 248 unemployed primary workers from employment gathering! | वाशिम जिल्हा  : रोजगार मेळाव्यातून २४८ बेरोजगारांची प्राथमिक निवड !

वाशिम जिल्हा  : रोजगार मेळाव्यातून २४८ बेरोजगारांची प्राथमिक निवड !

Next
ठळक मुद्देकारंजा येथे मेळावा जिल्हा उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा पुढाकार 

कारंजा लाड : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व कारंजा येथील एस. एस. एस. के. आर. इन्नाणी महाविद्यालय, विद्याभारती एच. एस. सी. व्होकेशनल  कोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा येथे ३० नोव्हेंबर रोजी आयोजित रोजगार मेळाव्यात २४८ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक अ. सं. ठाकरे, विद्याभारती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. राजपूत यांच्यासह उद्योजकांची उपस्थिती होती. सहाय्यक संचालक ठाकरे यांनी प्रास्ताविकातून म्हटले की, रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संधीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी लाभ घेण्याची गरज आहे. स्थानिक ठिकाणीच रोजगार मिळण्याची अपेक्षा न ठेवता अनुभवातून कौशल्य विकसित करण्यास युवकांनी प्राधान्य द्यावे, असे ठाकरे यावेळी म्हणाले.

प्राचार्य डॉ. पी. आर. राजपूत म्हणाले, बेरोजगारांची संख्या वाढत आहे. रोजगार मिळविण्यासाठी युवकांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. विविध क्षेत्रात प्रचंड मेहनतीच्या जोरावर आपण यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी बेरोजगार युवकांनी नकारात्मक विचार बाजूला ठेऊन रोजगाराच्या संधीतून स्वत:ची प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा.

रोजगार मेळाव्यात जळगाव, औरंगाबाद, वाशिम, नागपूर यासह विविध ठिकाणचे उद्योजक सहभागी झाले होते. या उद्योग प्रतिनिधींनी उपस्थित युवक-युवतींना रोजगार विषयक मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थित बेरोजगार युवक-युवतींच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्यापैकी २४८ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने कळविण्यात आले.

Web Title: Washim District: 248 unemployed primary workers from employment gathering!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.