वाशिम जिल्हा : पोलीस शिपाई भरतीत खेळाडूंना ५ टक्के आरक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 03:51 PM2018-01-24T15:51:38+5:302018-01-24T15:53:01+5:30

प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण देण्यासंदर्भात शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १ जुलै २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्वसमावेशक सुचना निर्गमित केलेल्या आहेत.

Washim District: 5 percent reservation for the players in the recruitment of the police. | वाशिम जिल्हा : पोलीस शिपाई भरतीत खेळाडूंना ५ टक्के आरक्षण!

वाशिम जिल्हा : पोलीस शिपाई भरतीत खेळाडूंना ५ टक्के आरक्षण!

Next
ठळक मुद्देपोलिस शिपाई भरतीसाठी अर्ज करताना खेळाडू कोणत्या संवगार्साठी पात्र ठरतो, याबाबत प्रमाणित केलेले प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.उमेदवारांनी त्यांच्या खेळाच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करुन त्याबाबतचा अहवाल ५ फेब्रुवारी २०१८ पूर्वी प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे.


वाशिम: सन २०१८ मध्ये होणाºया पोलिस शिपाई भरतीसाठी अर्ज करताना विभागीय क्रीडा उपसंचालकांनी क्रीडा प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत व खेळाडू कोणत्या संवगार्साठी पात्र ठरतो, याबाबत प्रमाणित केलेले प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र अर्जासोबत नसल्यास अर्जदाराचा खेळाडू संवगार्तून विचार करण्यात येणार नाही. जिल्ह्यातील पोलीस शिपाई भरतीसाठी इच्छुक खेळाडू उमेदवारांनी त्यांच्या खेळाच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करुन त्याबाबतचा अहवाल ५ फेब्रुवारी २०१८ पूर्वी प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे.
प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण देण्यासंदर्भात शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १ जुलै २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्वसमावेशक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार खेळाडू उमेदवाराने नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वीच सुधारीत तरतुदीनुसार विभागीय क्रीडा उपसंचालक यांचेकडून खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे खेळाडू उमेदवाराने अर्जासोबत विभागीय क्रीडा उपसंचालक यांनी क्रीडा प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत व खेळाडू कोणत्या संवगार्साठी पात्र ठरतो, याबाबत प्रमाणित केलेले प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. पडताळणी केलेल्या क्रिडा प्रमाणपत्राची प्रत अर्जासोबत जोडली नसल्यास उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार उमेदवाराचा खेळाडू संवगार्तून विचार करता येत नाही, असे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने म्हटले आहे.

Web Title: Washim District: 5 percent reservation for the players in the recruitment of the police.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.