वाशिम जिल्हा ९२.५२ टक्क्के निकालासह विभागात तिसर्या स्थानावर
By admin | Published: June 3, 2014 08:02 PM2014-06-03T20:02:22+5:302014-06-04T01:24:52+5:30
बारावीच्या परीक्षेत वाशिम जिल्हा ९२.५२ टक्के निकालास अमरावती विभागात तिसर्या स्थानावर आला आहे.
वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २0१४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत वाशिम जिल्हा ९२.५२ टक्के निकालास अमरावती विभागात तिसर्या स्थानावर आला आहे. मागील वर्षी जिल्हय़ात ८५.२५ टक्के निकालासह विभागात प्रथम क्रमांक पटकावला होता. एकीकडे निकालाची टक्केवारी ८५.२५ टक्केवरून ९२.५२ एवढी वाढली असताना मागील वर्षी विभागात प्राप्त केलेल्या प्रथम स्थानावरून जिल्हय़ाची पीछेहाट झाली आहे. जिल्हय़ात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी ११ हजार ७७१ नियमित विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी ११ हजार ७६0 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १0 हजार ८८0 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची निकालाची टक्केवारी ९२.५२ टक्के एवढी आहे. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५९८ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, ५२७६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४७९२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, २१४ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले आहेत. उत्तीर्ण १0 हजार ८८0 विद्यार्थ्यांमध्ये ६३४९ मुले व ४५३१ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.३१ तर मुलींची टक्केवारी ९४.२६ टक्के एवढी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली आहे. जिल्हय़ात विज्ञान शाखेचा निकाल ९६.६४ टक्के, कला शाखेचा ८९.९८ टक्के, वाणिज्य शाखेचा ९४.८0 टक्के तर व्होकेशनल शाखेचा ८४.४0 टक्के निकाल लागला आहे. १३ शाळांचा निकाल १00 टक्के निकाल लागला आहे. कारंजा तालुक्याचा निकाल जिल्हय़ात सर्वाधिक ९४.३२ टक्के लागला आहे. त्या खालोखाल वाशिम तालुक्याचा ९३.६९ टक्के, रिसोड तालुक्याचा ९२.२६ टक्के, मंगरुळपीर तालुक्याचा ९१.९७ टक्के, मानोरा तालुक्याचा ९0.७२ टक्के, तर मालेगाव तालुक्याचा ९0.४३ टक्के निकाल लागला आहे. निकालात वाशिम तालुक्यात नाव नोंदणी केलेल्या १६८४ मुले व ११२५ मुलींपैकी १५६१ मुले व १६६५ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांची टक्केवारी ९२.९२ टक्के, तर मुलींची टक्केवारी ९४.८४ टक्के आहे. मालेगाव तालुक्यात नाव नोंदविलेल्या ८८३ मुले व ५७२ मुलींपैकी ७७८ मुले व ५२५ मुली उत्तीर्ण झाल्या. या तालुक्यास उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८९.२४ तर मुलींची टक्केवारी ९२.२७ टक्के आहे. रिसोड तालुक्यात परीक्षेसाठी १७७५ मुले व १00६ मुलींनी नाव नोंदणी केली होती. या तालुक्यात यापैकी १६२४ मुले व ९४0 मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९१.५४ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९३.५३ टक्के आहे. कारंजा तालुक्यात परीक्षेसाठी ९६९ मुले व ९१४ मुलींनी नावनोंदणी केली. त्यापैकी ८९३ मुले व ८८३ मुली उत्तीर्ण झाली. तालुक्यात उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९२.१६ तर मुलींची टक्केवारी ९६.६१ आहे. मंगरुळपीर तालुक्यात ९५९ मुले व ७७२ मुलींनी नाव नोंदणी केली होती. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९0.५१ तर मुलींची ९३.७८ टक्के आहे. मानोरा तालुक्यात परीक्षेसाठी ६९0 मुले व ४२२ मुलींनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी ६१५ मुले व ३९३ मुली उत्तीर्ण झाल्या होत्या. या तालुक्यात उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८९.३९ तर मुलींची ९२.८९ टक्के एवढी आहे.