महसूल वसुलीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाचा आटापिटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:14 PM2018-03-24T22:14:08+5:302018-03-24T22:14:08+5:30

वाशिम : ३१ मार्चनंतर १ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष लागत असल्याने महसूल विभागाने वसुलीसाठी कंबर कसली आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी सोमवारपासून ६ दिवस शिल्लक असले तरी महाविर जयंती आणि गुड फ्रायडे अशा सलग दोन दिवस सुट्या आल्याने महसूल यंत्रणेचा ताप वाढला आहे.

Washim district administration to achieve the revenue recovery goal! | महसूल वसुलीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाचा आटापिटा!

महसूल वसुलीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाचा आटापिटा!

Next
ठळक मुद्देधावपळ ‘मार्च एन्डिंग’ची ४४ कोटीपैकी वसूल झाले ३० कोटी

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ३१ मार्चनंतर १ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष लागत असल्याने महसूल विभागाने वसुलीसाठी कंबर कसली आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी सोमवारपासून ६ दिवस शिल्लक असले तरी महाविर जयंती आणि गुड फ्रायडे अशा सलग दोन दिवस सुट्या आल्याने महसूल यंत्रणेचा ताप वाढला आहे.
जिल्ह्यातील महसूल यंत्रणेला यंदा ४४.५५ कोटी रुपयांच्या महसूल वसुलीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी शुक्रवार, २३ मार्चपर्यंत ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल वसूल करण्यात यंत्रणेला यश आले आहे. मात्र, उर्वरित रक्कम वसूल करताना अधिकारी, कर्मचाºयांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यातच मार्चअखेरच्या दिवसात सलग सुट्या देखील येत असल्याने वसूलीवर परिणाम जाणवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Web Title: Washim district administration to achieve the revenue recovery goal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.