फळबाग लागवडीवर वाशिम जिल्हा प्रशासनाचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 06:43 PM2018-06-09T18:43:47+5:302018-06-09T18:43:47+5:30

मालेगाव: जिल्ह्यात फळगाव लागवडीवर जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाच्यावतीने भर देण्यात येत आहे.

Washim district administration emphasizes on the cultivation of Horticulture | फळबाग लागवडीवर वाशिम जिल्हा प्रशासनाचा भर

फळबाग लागवडीवर वाशिम जिल्हा प्रशासनाचा भर

Next
ठळक मुद्देयासाठी ठिकठिकाणी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. असून, मालेगाव येथेही या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.फळबाग लागवडीचे उद्दिष्ट किमान ६ हजार हेक्टर असले तरी, यापेक्षाही अधिक फळबागा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.


मालेगाव: जिल्ह्यात फळगाव लागवडीवर जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाच्यावतीने भर देण्यात येत आहे. यासाठी ठिकठिकाणी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात येत असून, मालेगाव येथेही या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत वाशिम जिल्हा कोकणासारख फळबांगानी लदबदून टाकूया, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शेतकरी व प्रशासनाला केले.
मालेगाव येथील बालाजी लॉनमध्ये आयोजित फळबाग लागवड कार्यशाळेला जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मिना, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने,  जि. प. कृषी सभापती विश्वनाथ सानप, तहसीलदार राजेश वजिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेला संबोधित करताना जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले की, वाशिम जिल्ह्याच्या माध्यमातून आपण प्रथमच विदर्भाच्या सेवेत आलो आहोत. यावेळी हापूस आंबा आणि काजूच्या माध्यमातून कोकणातील फळबागांची समृद्धता त्यांनी मांडली. यावेळी वाशिम जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि शेतजमिनीच्या पोताचा विचार करता या जिल्ह्यात फळबाग लागवड निश्चितच यशस्वी होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि शेतकºयांनी व्यावहार्यपणातून शेती करावी, असे आवाहनही केले. पारंपरिक पिकांपेक्षा फळबाग लागवड केल्यास उत्पन्नात भर पडून शेतकºयांचे जीवनमान उचांवल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. वाशिम जिल्ह्यासाठी फळबाग लागवडीचे उद्दिष्ट किमान ६ हजार हेक्टर असले तरी, यापेक्षाही अधिक फळबागा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Washim district administration emphasizes on the cultivation of Horticulture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.