पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी वाशिम जिल्हा प्रशासन सज्ज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 05:16 PM2018-01-24T17:16:23+5:302018-01-24T17:18:38+5:30
वाशिम : ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ आजारापासून सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून २८ जानेवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. वाशिम जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, फिरते बूथदेखील कार्यरत केले जाणार आहेत.
वाशिम : ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ आजारापासून सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून २८ जानेवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. वाशिम जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, फिरते बूथदेखील कार्यरत केले जाणार आहेत.
पोलिओ (बालपक्षाघात) म्हणजे विषाणूमुळे येणारा लुळेपणा. हा आजार बहुतकरून २ वर्षाखालील मुुलांना होतो. पाच वर्षे वयापर्यंतच्या लस न दिलेल्या मुलांना, विशेषत: पावसाळयात याच्यापासून धोका असतो. हा आजार झालेली ८० टक्के मुले एक ते दोन वर्षे गटातील असतात, असा दावा आरोग्य विभागाने केला. पोलिओचे सूक्ष्म विषाणू असतात. ० ते ५ वर्षे वयोगटातील मुलांना पोलिओ आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविली जाते. यावर्षी २८ जानेवारी २०१८ व ११ मार्च २०१८ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. शहरी व ग्रामीण अशा दोन्ही विभागाची जबाबदारी सांभाळणाºया आरोग्य विभागाने गाव व वार्डनिहाय बूथ स्थापन केले असून, अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांची नेमणूकही केली आहे. २८ जानेवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५ वर्षाआतील बालकांना पोलिओचा डोज पाजला जाणार आहे. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी बस स्थानक, रेल्वे स्टेशन, नाके इत्यादी ठिकाणी फिरते बूथ कार्यरत राहणार आहेत. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात आला असून, आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवकांना योग्य त्या सूचना द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. नागरिकांनी जवळच्या बुथवर जावून बालकांना पोलिओचा डोज द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ए. ए. राऊत यांनी केले.