वाशिम जिल्हा : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची प्रतिक्षा कायम! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 07:20 PM2018-01-28T19:20:32+5:302018-01-28T19:21:08+5:30

वाशिम: जिल्ह्यात विविध महाविद्यालयात उच्च शिक्षण घेणाºया शेकडो विद्यार्थ्यांची मागील वर्षीची अर्थात सन २०१६-१७ या वर्षाची शिष्यवृत्ती अद्यापही त्यांना मिळाली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अनेक अडचणी येत आहेत. 

Washim District: College students waiting for scholarship! | वाशिम जिल्हा : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची प्रतिक्षा कायम! 

वाशिम जिल्हा : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची प्रतिक्षा कायम! 

googlenewsNext
ठळक मुद्देअनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात विविध महाविद्यालयात उच्च शिक्षण घेणाºया शेकडो विद्यार्थ्यांची मागील वर्षीची अर्थात सन २०१६-१७ या वर्षाची शिष्यवृत्ती अद्यापही त्यांना मिळाली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अनेक अडचणी येत आहेत. 
शासनाच्या विविध योजनेंतर्गत महाविद्यालयीन शिक्षण घेणाºया अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास प्रवर्ग व भटक्या जमातीमधील विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागामार्फत दरमहा शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. साधारणपणे वर्षभराची शिष्यवृत्ती एकदाच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होत असते. मागील सत्रातील सन २०१६-१७ ची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मार्च २०१७ पर्यंत मिळणे अपेक्षीत होते; परंतु यंदाचे सत्र अर्ध्याहून अधिक संपले असतानाही अद्याप गतवर्षीची शिष्यवृत्तीच अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. प्रामुख्याने पदवीचे शिक्षण घेणाºया विविध शाखातील विद्यार्थ्यांसह ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. जवळपास दीड हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. दरम्यान, या संदर्भात वाशिम येथील समाज कल्याण विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता शासनाकडून मिळालेल्या निधीनुसार विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून, येत्या काही दिवसांत निधी प्राप्त झाल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांच्या खात्यात त्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती जमा करण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. 
 

Web Title: Washim District: College students waiting for scholarship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.