वाशिम जिल्हा परिषद ‘सेस’चा ८३ लाखांचा निधी अखर्चित
By Admin | Published: June 16, 2016 02:16 AM2016-06-16T02:16:01+5:302016-06-16T02:16:01+5:30
लघुसिंचन विभागातील प्रकार; ४३ कामांसाठी होती १.२0 कोटी निधीची तरतूद!
संतोष वानखडे / वाशिम
नाला खोलीकरण, कोल्हापुरी बंधारे दुरुस्ती यासह लघू सिंचनाच्या कामांसाठी ह्यसेसह्णमधून मिळालेल्या १.२0 कोटींपैकी मार्च २0१६ अखेर जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागाला केवळ ३७ लाख ३९ हजार रुपये खर्च करता आले. उर्वरित ८२ लाख ६१ हजारांचा निधी अखर्चित राहिला आहे.
मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात विविध प्रकारची विकासात्मक कामे केली जातात. विविध कामांची विभागणी करून नियोजनाची जबाबदारीही त्या-त्या विभागावर सोपविण्यात येते. ग्रामीण भागात लघू सिंचनाच्या सुविधा निर्माण करणे, कोल्हापुरी बंधार्याची दुरुस्ती, नव्याने कोल्हापुरी बंधार्याची निर्मिती, नाला खोलीकरण व नाला सरळीकरण, डोह खोदणे आदी कामांची जबाबदारी लघू सिंचन विभागावर सोपविण्यात आली आहे. या कामांमधून सिंचनाची सुविधा निर्माण करणे, जलपातळीत वाढ करणे अपेक्षित आहे. कामांचा अनुशेष भरून काढणे, नादुरूस्त बंधार्यांची दुरूस्ती करणे, नवीन कामे प्रस्तावित करणे आदी कामांचे नियोजन करून जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातून ह्यसेसह्ण फंडांतर्गत या कामांसाठी निधीची तरतूद केली जाते.
सन २0१५-१६ या वर्षात लघू सिंचन विभागाने एकूण ४३ कामे प्रस्तावित केली होती. या कामांसाठी एकूण १ कोटी २0 लाख रुपयांचा निधीही मंजूर होता. ४३ कामांची प्रत्यक्षात पाहणी व मोजमाप केल्यानंतर एकूण ३७ लाख ३९ हजार रुपयांचा निधी खर्च झाल्याची बाब निदर्शनात आली. त्यानुसार ३१ मार्च २0१६ अखेर या कामांवर ३७.३९ लाख रुपये खर्च झाला असून, उर्वरित ८२.६१ लाखांचा निधी अखर्चित राहिला. ह्यसेसह्णचा हा निधी जिल्हा परिषदेचा असल्याने सदर निधी शासनाकडे जमा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मात्र, हा निधी २0१६-१७ या वर्षात लघू सिंचन विभागालाच मिळेल, याची कोणतीही खात्री देता येत नाही. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचा अखर्चित निधी एकत्रित करून २0१६-१७ या वर्षासाठी या निधीचे नियोजन विभागनिहाय केले जाणार आहे.