वाशिम जिल्ह्यात पहिल्याच दिवशी ११ कॉपीबहाद्दरांवर कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 06:42 PM2018-02-21T18:42:26+5:302018-02-21T18:46:00+5:30
वाशिम : जिल्ह्यातील ६४ परीक्षा केंद्रांवर बुधवार, २१ फेब्रुवारीपासून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेला (इयत्ता बारावी) प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी असलेल्या इंग्रजी पेपरला कॉपी करताना आढळून आलेल्या ११ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.
वाशिम : जिल्ह्यातील ६४ परीक्षा केंद्रांवर बुधवार, २१ फेब्रुवारीपासून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेला (इयत्ता बारावी) प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी असलेल्या इंग्रजी पेपरला कॉपी करताना आढळून आलेल्या ११ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी तब्बल ७ विद्यार्थी मालेगाव तालुक्यातील मारसूळ येथील मातोश्री सुमनताई इंगळे विद्यालय या परीक्षा केंद्रावर कॉपी करताना आढळून आले. दरम्यान, या केंद्राची अमरावती विभागीय बोर्डाकडे तक्रार देखील करण्यात आल्याची माहिती वाशिमचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांनी दिली.
यंदा जिल्ह्यातील एकूण १९ हजार २२९ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. दरम्यान, ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी, केंद्रांवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, महिला डाएट प्राचार्य यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटशिक्षणाधिकाºयांची भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यानुसार, आज पहिल्या दिवशी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांच्या पथकाने मालेगाव तालुक्यातील मारसूळ येथील मातोश्री सुमनताई इंगळे विद्यालय या परीक्षा केंद्रावर धडक दिली. कॉप्यांचा अक्षरश: सुळसुळाट असलेल्या या केंद्रावर डॉ. नागरे यांच्या पथकाने तीन विद्यार्थ्यांना निलंबित केले. विशेष गंभीर बाब म्हणजे याच केंद्रावर मालेगाव गटशिक्षणाधिकाºयांच्या भरारी पथकाने धडक देवून आणखी तीन विद्यार्थ्यांना निलंबित केले. यासह डव्हा येथील जोगदंड विद्यालयातही कॉपी करणाºया एका विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली. उपशिक्षणाधिकाºयांच्या पथकाने शिवाजी विद्यालय, कोयाळी (ता.रिसोड) या परीक्षा केंद्रावर धडक देवून कॉपी करताना आढळून आलेल्या तीन विद्यार्थ्यांना निलंबित केले. अशाप्रकारे पहिल्याच दिवशी ११ विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांनी दिली.