वाशिमचे जिल्हा सामान्य रुग्णालय बनले वाहनतळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 02:11 PM2018-09-08T14:11:07+5:302018-09-08T14:13:19+5:30
वाशिम : जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जड वाहनांसह मोटारसायक ठेवण्याचे स्थळ बनले असून याकडे मात्र प्रशासनाचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जड वाहनांसह मोटारसायक ठेवण्याचे स्थळ बनले असून याकडे मात्र प्रशासनाचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मुख्यव्दारापासून ते अपघात कक्षापर्यंत खूप मोठा रस्ता आहे. या रस्त्याच्या कडेला शहरात आलेले ट्रक, मिनी ट्रक, टेम्पो, कार व मोटारसायकलस्वार आपली वाहने ठेवून दिवसदिवसभर गायब राहत आहेत. यामध्ये अनेक अपडाऊन करणाºया कर्मचाºयांचाही सहभाग दिसून येतो. रुग्णालयाच्या जवळच अकोला नाका असून येथून मालेगाव, शिरपूर, डोंगरकिन्ही, मेहकर, अकोल्यासह ईतर गावासाठी बस थांबा आहे. शहरातून या गावी जाणारे अनेक शिक्षक व ईतर कर्मचारी चक्क आपली वाहने जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी नेवून ठेवतात. कर्तव्य बजावून झाल्यानंतर संध्याकाळी येथे येवून पुन्हा घेवून जात आहेत. याशिवाय शहरात आलेले ट्रक सुध्दा सद्यस्थितीत रुग्णालयाच्या परिसरातच उभे राहतांना दिसून येत आहेत. ही वाहने तास-न-तास उभे राहत असतांना सुध्दा याकडे कोणाचेही लक्ष दिसून येत नाही. विशेष म्हणजे या वाहनाला येथे थांबण्यासाठी कोणीच अटकाव करीत नसल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय वाहन तळ बनल्याचे दिसून येत आहे. यांसदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या भ्रमणध्वनीवर पूर्ण रिंग गेली परंतु त्यांनी उचलला नाही.
अत्यवस्थ रुग्णावर उपचारास होवू शकतो विलंब
जिल्हा सामान्य रुग्णालयात अपघातासह अनेक अत्यवस्थ रुग्ण रुग्णवाहिकेतून आणल्या जातात. यावेळी रस्त्याच्या मधात किंवा बाजुला एकसारखी उभ्या असलेल्या वाहनांमुळे अत्यवस्थ रुग्णांवर उपचारास विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.