वाशिम जिल्ह्याला उसने मिळाले ३०० रेमडेसिविर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:42 AM2021-05-09T04:42:22+5:302021-05-09T04:42:22+5:30

अमरावती विभागातील वाशिमसह सर्वच पाचही जिल्ह्यांत आजमितीला कोरोनाने कहर चालविला आहे. दैनंदिन चाचण्यांपैकी सुमारे १५ ते २० टक्क्यांपेक्षाही ...

Washim district gets loan of Rs | वाशिम जिल्ह्याला उसने मिळाले ३०० रेमडेसिविर

वाशिम जिल्ह्याला उसने मिळाले ३०० रेमडेसिविर

Next

अमरावती विभागातील वाशिमसह सर्वच पाचही जिल्ह्यांत आजमितीला कोरोनाने कहर चालविला आहे. दैनंदिन चाचण्यांपैकी सुमारे १५ ते २० टक्क्यांपेक्षाही अधिक चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. परिणामी सक्रिय रुग्णसंख्येचा आलेख सतत चढता आहे. रुग्णसंख्या वाढत आहे. परिणामी खाटा, औषधीचा तुटवडा पडत आहे. कोरोनाच्या आजारावर काहीअंशी रामबाण ठरत असलेल्या रेमडेसिविरची टंचाई तर प्रचंड वाढली आहे. कुठेच रेमडेसिविर मिळत नाहीत. नेमकी हीच बाब हेरून अकोल्याच्या एका विधिज्ञांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. सदर याचिकेची दखल घेत न्यायालयाने अकोला जिल्ह्यासाठी ३ हजार रेमडेसिविर उपलब्ध करून देण्याचे सरकारला आदेशित केले होते. त्यानुसार सदर इंजेक्शन अकोल्यात पोहोचले. मात्र, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यांची गरज लक्षात घेता विभागीय आयुक्तांनी यातील ५०० व्हायल अमरावतीला तर २५० व्हायल यवतमाळला उसने देण्याचे संबंधितांना आदेशित केले होते. अमरावती, यवतमाळच्या तुलनेत वाशिम जिल्ह्याला मिळणारे रेमडेसिविर कमी आहेत. रुग्णसंख्या मात्र लोकसंख्येच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांच्या धर्तीवर वाशिमला ५०० व्हायल उसने देण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी घोपे यांनी आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली होती. याबाबत त्यांनी थेट आयुक्तांशी संपर्कही केला होता. सदर पाठपुराव्याची दखल घेत विभागीय आयुक्तांनी वाशिम जिल्ह्याला अकोल्याच्या ३ हजार व्हायलमधून ३०० रेमडेसिविर उपलब्ध करून दिले आहेत.

Web Title: Washim district gets loan of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.