वाशिम जिल्ह्यात सरासरीच्या ९० टक्के पर्जन्यमान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:39 PM2018-08-25T12:39:56+5:302018-08-25T12:41:17+5:30

वाशिम : जिल्ह्यात दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ७९८ मिलीमिटर पाऊस कोसळतो. यंदा मात्र आॅगस्ट संपण्यापूर्वीच अर्थात २४ तारखेपर्यंत ७२४.७६ (९०.७४ टक्के) पर्जन्यमान झाले

Washim district has an average rainfall of 90 percent! | वाशिम जिल्ह्यात सरासरीच्या ९० टक्के पर्जन्यमान!

वाशिम जिल्ह्यात सरासरीच्या ९० टक्के पर्जन्यमान!

Next
ठळक मुद्दे यावर्षी जिल्ह्यातील मध्यम व लघू अशा १३१ प्रकल्पांपैकी ७० पेक्षा अधिक प्रकल्प तुडूंब झाले. कारंजा आणि मानोरा या दोन तालुक्यांमधील सुमारे १४ हजार हेक्टरवरील खरीप पिकांना जबर फटका बसला.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ७९८ मिलीमिटर पाऊस कोसळतो. यंदा मात्र आॅगस्ट संपण्यापूर्वीच अर्थात २४ तारखेपर्यंत ७२४.७६ (९०.७४ टक्के) पर्जन्यमान झाले. यामुळे जिल्ह्यातील ७० सिंचन प्रकल्प पाण्याने तुडूंब भरले असून दोन तालुक्यांमधील काही गावांचा अपवाद वगळता अन्य चार तालुक्यांमध्ये खरीप हंगामातील पीक परिस्थितीही समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, जून ते सप्टेंबर अशा चार महिन्याच्या कालावधीत वाशिम तालुक्यात ९११.६० मिलीमिटर, मालेगाव ८३९.९०, रिसोड ७५०.७०, मंगरूळपीर ७७८.९०, मानोरा ७६०.३० आणि कारंजा तालुक्यात ७५०.८० असे एकूण ४७९२ मिलीमिटर पाऊस कोसळतो. त्याची सरासरी ७९८.७० मिलीमिटर असते. यंदा मात्र आॅगस्ट महिना संपण्यापूर्वीच ४३४८ मिलीमिटर अर्थात सरासरी ७२४.७६ मिलीमिटर पाऊस झाला आहे. 
दरम्यान, समाधानकारक पावसामुळे यावर्षी जिल्ह्यातील मध्यम व लघू अशा १३१ प्रकल्पांपैकी ७० पेक्षा अधिक प्रकल्प तुडूंब झाले असून आगामी रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी या पाण्याचा अपेक्षित फायदा होणार असल्याचे शेतकºयांमधून बोलले जात आहे. यावर्षीच्या जोरदार पावसामुळे मध्यंतरी उद्भवलेल्या पीक परिस्थितीमुळे कारंजा आणि मानोरा या दोन तालुक्यांमधील सुमारे १४ हजार हेक्टरवरील खरीप पिकांना जबर फटका बसला. हा अपवाद वगळता अन्य चार तालुक्यांमधील पिकांना पाऊस पोषक ठरला असून यंदा विक्रमी उत्पन्न मिळण्याची आशा शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: Washim district has an average rainfall of 90 percent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.