वाशिम : जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वकृत्व करंडक स्पर्धेचा निकाल जाहीर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 08:16 PM2018-01-17T20:16:44+5:302018-01-17T20:21:12+5:30
वाशिम: महाविद्यालयीन युवक-युवतींना सहभागी करून घेत राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने दरवर्षी स्वच्छता मित्र वत्कृत्व कंरडक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार, यावर्षी जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत वरिष्ठ गटातून कारंजा येथील के.पी.पी.आर.सी. कॉलेजच्या गिगाणी साकिबने, तर कनिष्ठ गटातून नवोदय कनिष्ठ महाविद्यालयाची अर्पिता जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
लोकमत न्यूज नेटवर्क

१६ जानेवारीला वाशिम येथील तुळशीराम जाधव कला व विज्ञान महाविद्यालयात जिल्हास्तरीय वत्कृत्व स्पर्धा पार पडली. यात वरिष्ठ गटातून रिसोडची विद्यार्थीनी मयुरी वाघ, आर.ए.कॉलेजची विद्यार्थीनी तेजस्विनी माणिकराव यांनी पारितोषिक मिळविले. कनिष्ठ गटातून नवोदय विद्यालयाची सिद्धी मुंदडा आणि मंगरूळपीरची विद्यार्थीनी साक्षी आंबाडे यांना स्वच्छ भारत मिशनकडून ११ हजार, ७ हजार, ५ हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. यावेळी आमदार विजय जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम ईस्कापे, जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य गांवडे, आरसीआय अभिंयता पंकज बाजड, सचिव पांडे, स्वच्छ भारत मिशनच्या पुष्पलता अफुणे, विजय नागे, प्रदिप सावळकर,अमित घुले उपस्थित होते.