वाशिम जिल्हास्तरीय निर्यातक्षम भाजीपाला खरेदीदार-विक्रेता संमेलन सोमवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 04:04 PM2018-08-08T16:04:17+5:302018-08-08T16:05:17+5:30
वाशिम : कृषी विभाग व करडा कृषि विज्ञान केंद्र यांच्यावतीने निर्यातक्षम भाजीपाला या विषयावर जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन सोमवार, १३ आॅगस्ट २०१८ रोजी वाशिम येथे आयोजित करण्यात आले आहे.
वाशिम : कृषी विभाग व करडा कृषि विज्ञान केंद्र यांच्यावतीने निर्यातक्षम भाजीपाला या विषयावर जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन सोमवार, १३ आॅगस्ट २०१८ रोजी वाशिम येथे आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा हे राहणार आहेत. संमेलनात भाजीपाला निर्यात या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अपेडा, पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघ तसेच नागपूर व मुंबई येथील नामांकित भाजीपाला निर्यात करणाºया कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून शेतकरी गटांसोबत निर्यातक्षम भाजीपाला उत्पादन व निर्यातबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील शेतकरी भाजीपालावर्गीय शेतीकडे वळत असून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, भाजीपाला क्षेत्र आणखी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून सदर संमेलन आयोजित करण्यात आल्याचे कृषी विभागाने कळविले आहे. जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी, शेतकरी उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालकांनी केले.