वाशिम  जिल्हास्तरीय लोकशाही दिनात १६ तक्रारी निकाली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 02:05 PM2017-12-05T14:05:28+5:302017-12-05T14:07:50+5:30

वाशिम : ४ डिसेंबरला पार पडलेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात २६ तक्रारींवर सुनावणी घेतली असून, यापैकी १६ तक्रारी निकाली निघाल्या. उर्वरीत प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना   जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या.

Washim District Level Lokshahi Din gets 16 complaints! | वाशिम  जिल्हास्तरीय लोकशाही दिनात १६ तक्रारी निकाली !

वाशिम  जिल्हास्तरीय लोकशाही दिनात १६ तक्रारी निकाली !

googlenewsNext
ठळक मुद्दे२६ तक्रारींवर सुनावणी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना 

वाशिम : ४ डिसेंबरला पार पडलेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात २६ तक्रारींवर सुनावणी घेतली असून, यापैकी १६ तक्रारी निकाली निघाल्या. उर्वरीत प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना   जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या या लोकशाही दिनाला जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, कारंजाचे उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाºयांनी आपले सरकार पोर्टलवर प्रलंबित असलेल्या तक्रारींचा आढावा घेतला. तसेच नागरिकांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी सर्व शासकीय विभागांच्या अधिकाºयांनी लोकशाही दिन व आपले सरकार पोर्टलवर दाखल झालेल्या आपल्या विभागाशी संबंधित तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचनाही दिल्या. दरम्यान, व्यापक प्रमाणात जनजागृती नसल्याने लोकशाही दिनात दाखल होणाºया तक्रारींचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. 

Web Title: Washim District Level Lokshahi Din gets 16 complaints!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.