वाशिम जिल्हा : लोकगिताच्या माध्यमातून एड्स नियंत्रणाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 02:38 PM2017-12-06T14:38:25+5:302017-12-06T14:40:16+5:30
वाशिम : एचआयव्ही, एड्स विषयी जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी व वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने जिल्हाभरात रॅली काढून जनजागृती करण्यात आली. दरम्यान ५ डिसेंबर रोजी वाशिमात सायंकाळपर्यंत जनजागृतीपर विविध कार्यक्रम घेण्यात आले.
वाशिम : एचआयव्ही, एड्स विषयी जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी व वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने जिल्हाभरात रॅली काढून जनजागृती करण्यात आली. दरम्यान ५ डिसेंबर रोजी वाशिमात सायंकाळपर्यंत जनजागृतीपर विविध कार्यक्रम घेण्यात आले.
वाशिम येथे जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जिल्हा सामान्य रुग्णालय येथून रॅलीस सुरुवात झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जे. एम. जांभरुणकर, डॉ. अनिल कावरखे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. किशोर लोणकर, डॉ. सुधाकर जिरवणकर, डॉ. राहुल पाटील, आय. एम. ए. चे अध्यक्ष डॉ. संदेश राठोड, डॉ. अवचार, डॉ. इंगळे, डॉ. पाटील, मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष मनीष मंत्री आदी उपस्थित होते. जिल्हा सामान्य रुग्णालय येथून निघालेली रॅली अकोला नाका, पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानकमार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये शहरातील शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. यावेळी समता संदेश कलापथकच्या चमूने लोकगितांच्या माध्यमातून एड्स नियंत्रणाचा संदेश दिला. तसेच हस्तपत्रिका वाटप करून नागरिकांना एचआयव्ही, एड्स नियंत्रणाची माहिती देण्यात आली.
समारोपीय कार्यक्रमात यावेळी डॉ. किशोर लोणकर यांनी उपस्थित युवक-युवतींना मार्गदर्शन केले. संचालन धम्मपाल मनवर यांनी तर आभार समुपदेशक पंढरी देवळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा पर्यवेक्षक रवी भिसे, आरती वानखेडे, मिलिंद घुगे, जया वानखेडे, बाबाराव भगत, अनिल राठोड, संगीता आगासे, सुलोचना मोरे, जिशा वरीद, निलंश अल्लाडा, रामा कांबळे, आदींनी सहकार्य केले.