वाशिम जिल्ह्यातील नगर पालिका, नगर पंचायतचे कर्मचारी बेमुदत संपावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 04:46 PM2019-01-01T16:46:36+5:302019-01-01T16:46:41+5:30
वाशिम : जिल्ह्यातील चार नगर पालिका व दोन नगर पंचायतीच्या कर्मचाºयांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार, १ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारून कामबंद आंदोलनाचे हत्यार उगारले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील चार नगर पालिका व दोन नगर पंचायतीच्या कर्मचाºयांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार, १ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारून कामबंद आंदोलनाचे हत्यार उगारले आहे.
नगर परिषद, नगर पंचायतींमध्ये कार्यरत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, रोजंदारी, कंत्राटी कर्मचारी, अनुकंपाधारकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत यापुर्वी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली. मात्र, शासनाने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. याविरोधात आक्रमक पवित्रा अंगिकारत महाराष्ट्र राज्य नगर पंचायत, नगर परिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटना, कर्मचारी महासंघ सलंग्न भारतीय मजदूर संघ,अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन, सफाई कामगार संघटना, रोजंदारी कर्मचारी कृती समिती, सर्व सफाई कामगार संघटना, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनांमधील कर्मचाºयांनी आंदोलनात्मक पवित्रा अंगिकारला आहे.
त्यानुसार, १५ डिसेंबरला या कर्मचाºयांनी धरणे आंदोलन केले होते. मागण्या मान्य न झाल्याने २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत शासनाच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. याहीऊपरही मागण्यांची दखल न घेतल्या गेल्याने अखेर नगर परिषद, नगर पंचायतींमध्ये कार्यरत सर्व कर्मचाºयांनी आक्रमक पवित्रा अंगिकारत मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला असून काम बंद आंदोलन केले जात आहे. यामुळे नागरिकांची अत्यावश्यक कामे खोळंबली असून शासनाने कर्मचाºयांच्या मागण्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे.