वाशिम जिल्हा पोलीस गुन्ह्यांचा उलगडा करण्यात महाराष्ट्रात द्वितीय क्रमांकावर!
By नंदकिशोर नारे | Published: July 17, 2023 02:38 PM2023-07-17T14:38:11+5:302023-07-17T14:39:03+5:30
त्यानुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गुन्हे आढावा बैठक पार पडली.
वाशिम : वाशिम जिल्हा पोलीस दल जिल्ह्यात दाखल गुन्ह्यांचा उलगडा करण्यात १०० टक्के यशस्वी ठरले असून महाराष्ट्रात द्वितीय क्रमांकावर पोहोचला आहे. ११ व १२ जुलै २०२३ रोजी पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे महाराष्ट्र पोलीस दलाची अर्धवार्षिक गुन्हे आढावा बैठक पार पडली.
त्यानुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गुन्हे आढावा बैठक पार पडली. सदर गुन्हे आढावा बैठकीला अपर पोलीस अधीक्षक, वाशिम, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पो.स्टे.प्रभारी अधिकारी व सर्व शाखा अधिकारी उपस्थित होते.
उत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये कारंजा प्रथम
वाशिम जिल्हा पोलीस दलातील पोलीस स्टेशन स्तरावर ‘उत्कृष्ट पोलीस स्टेशन’ निवडण्याकरिता नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार पो.स्टे.कारंजा ग्रामीणला प्रथम क्रमांक, पो.स्टे.कारंजा शहरला द्वितीय क्रमांक तर पो.स्टे.रिसोड ला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. त्यावेळी सबंधित पो.स्टे.प्रभारी अधिकारी व गुन्हे तपासामध्ये १३ अधिकारी व ३२ अंमलदार, सीसीटीएनएस मध्ये उत्कृष्ट काम करणारे ०५ अंमलदार, वाहतूक शाखेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे १ अंमलदार व अपघातग्रस्त युवकास वेळेवर उपचाराकरिता दाखल करून त्याचा जीव वाचविणाऱ्या ०७ अंमलदार अशा एकूण १६ अधिकारी व ४५ अंमलदारांचा सत्कार मा.पोलीस अधीक्षक बच्चन सिंह (आयपीएस) यांच्याहस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.