वाशिम जिल्ह्यात १ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 01:29 PM2018-03-21T13:29:23+5:302018-03-21T13:29:23+5:30
वाशिम : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होण्यासाठी जिल्ह्यात १ एप्रिल २०१८ र्पंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले.
वाशिम : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होण्यासाठी जिल्ह्यात १ एप्रिल २०१८ र्पंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले.
आगामी सण, उत्सव, यात्रा लक्षात घेता जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच शांतता कायम राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने १ एप्रिल २०१८ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले. १ एप्रिलपर्यंत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे हा गुन्हा ठरणार आहे. तसेच कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, वाद्य वाजविणे, किंकाळ्या फोडणे किंवा जाहीरपणे प्रक्षोभक घोषणा, भाषणे करणे किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशी कोणतीही कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे. अंत्ययात्रा, धार्मिकविधी, सामाजिक सण, लग्न सोहळे यांना हा आदेश लागू नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले. तसेच उपविभागीय अधिकारी यांना या आदेशामधून समोचित प्रकरणामध्ये अधिकार क्षेत्रामध्ये स्थानिक पोलीस अधिकाºयांशी सल्लामसलत करून सूट देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत.
पोहरादेवी येथील मंदिर परिसरात बोकड बळी देण्यास बंदी
मानोरा तालुक्यातील पोहरादेवी व उमरी खुर्द येथे २६ मार्च २०१८ या रोजी बंजारा समाज बांधवांची यात्रा भरते. या यात्रेमध्ये बोकड बळी देवून नवस फेडण्याची प्रथा आहे. मात्र न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार जगदंबा मंदिरासमोर बोकडबळी देण्याची प्रथा बंद करण्यात आली आहे. यात्रेमध्ये बोकडबळी प्रथेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होवू नये, याकरिता फौजदार प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये पोहरादेवी येथील जगदंबा देवीच्या यात्रेमध्ये मुख्य मंदिराचे मंडप वा त्या लगतच्या ५०० मीटर यात्रा परिसरात २२ मार्च ते २६ मार्च २०१८ या कालावधीत बोकडबळी देण्यावर, सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांच्या कत्तलीवर निर्बंध घालण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी दिले.