शौचालय उद्दिष्टपूर्तीत वाशिम जिल्हा राज्यात दुसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 10:09 AM2020-07-24T10:09:51+5:302020-07-24T10:10:06+5:30
राज्यात वाशिम जिल्हा दुसऱ्या स्थानी असून, पहिला क्रमांक भंडारा जिल्ह्याचा असल्याचे २२ जुलै रोजी स्पष्ट झाले.
वाशिम : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामाच्या उद्दिष्टपूर्तीत राज्यात वाशिम जिल्हा दुसऱ्या स्थानी असून, पहिला क्रमांक भंडारा जिल्ह्याचा असल्याचे २२ जुलै रोजी स्पष्ट झाले. तसेच पश्चिम विदर्भातील (वºहाड) बुलडाणा जिल्हा शौचालय बांधकामाच्या उद्दिष्टपूर्तीत राज्यात तिसºया स्थानावर आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत एकही कुटुुंब शौचालयापासून वंचित राहू नये म्हणून यापूर्वीच्या पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या कुटुंबालादेखील शौचालय बांधून मिळावे, याकरिता पुन्हा सर्व्हे करण्यात आला होता. वाशिम जिल्ह्यात शौचालय बांधकामातून सुटलेल्या कुटुंबाचे एकूण उद्दिष्ट २० हजार १४१ एवढे होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीणा यांच्यासह स्वच्छ भारत मिशनच्या चमूचा आढावा घेतला. मीणा यांनी ग्रामसेवकांच्या वारंवार स्वतंत्र बैठका घेऊन विहित मुदतीपूर्वी उद्दिष्टपूर्ती होण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यापूर्वी शौचालय बांधल्यानंतर तालुका स्तरावर केवळ प्रस्ताव घेऊन पंचायत समितीमार्फत पडताळणी करणे आणि त्यानंतर जिल्हा स्तरावरून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात निधी वळता केला जात होता. यामध्ये वेळेचा अपव्यय होत असल्याने मीणा यांनी तालुका स्तरावरून निधी वितरणाचे आदेश दिले. काही निवडक ग्राम पंचायतींना थेट निधी वितरीत करून त्यांच्यामार्फत शौचालयाची कामे करून घेतली. विहित मुदतीत शौचालय बांधकामाची उद्दिष्टपूर्ती झाल्याने राज्यात वाशिम जिल्हा द्वितीय स्थानी तर अमरावती विभागात पहिल्या स्थानी आहे. भंडारा जिल्हा राज्यात पहिल्या स्थानी असून, तिसºया स्थानी बुलडाणा जिल्हा आहे.