वाशिम जिल्ह्यात गहू पेरणीस सुरूवात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 05:28 PM2018-10-31T17:28:13+5:302018-10-31T17:28:32+5:30

वाशिम : जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये सद्या शेतकºयांकडून गहू पेरणीस सुरूवात करण्यात आली आहे. यासाठी प्रामुख्याने ट्रॅक्टरचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.

Washim district starts wheat sowing! | वाशिम जिल्ह्यात गहू पेरणीस सुरूवात!

वाशिम जिल्ह्यात गहू पेरणीस सुरूवात!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये सद्या शेतकºयांकडून गहू पेरणीस सुरूवात करण्यात आली आहे. यासाठी प्रामुख्याने ट्रॅक्टरचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, तुलनेने अधिक पाणी लागत असलेल्या गहू या पिकाच्या सिंचनाकरिता पुरेशी वीज मिळण्याची अपेक्षा शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबिन; तर रब्बी हंगामात गहू आणि हरभरा या पिकांचे उत्पन्न सर्वाधिक घेतले जाते. असे असले तरी जिल्ह्यातील अधिकांश शेतीचे क्षेत्र कोरडवाहू असून सिंचनाची प्रभावी सोय उपलब्ध नसल्याने शेतशिवारांमधील उपलब्ध जलस्त्रोतांव्दारेच शेतकरी गहू व हरभरा या पिकांना पाणी देतात. त्यासाठी महावितरणकडून अखंडित वीज मिळणे आवश्यक आहे. सद्या मात्र ग्रामीण भागात १४ तासांच्या भारनियमनाव्यतिरिक्त वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याची समस्या बळावल्याने रब्बी हंगामातील पिकांवर त्याचा विपरित परिणाम जाणवणार आहे. ही बाब लक्षात घेवून महावितरणने किमान पिकांच्या सिंचनाकरिता लागणारी वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.

Web Title: Washim district starts wheat sowing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.