अंगणवाडी विकासावर वाशिम जिल्ह्याचा भर
By admin | Published: February 28, 2017 03:25 PM2017-02-28T15:25:18+5:302017-02-28T15:25:18+5:30
राज्य शासनाने दरवर्षी राज्यातील किमान 5 हजार अंगणवाड्या विकसित करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमांतर्गत वाशिम जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल- कल्याण विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 28 - राज्य शासनाने दरवर्षी राज्यातील किमान 5 हजार अंगणवाड्या विकसित करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमांतर्गत वाशिम जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल- कल्याण विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील 60 पेक्षा अधिक अंगणवाड्या पूर्ण विकसित करण्यात आल्या असून, आदर्श अंगणवाडी सेविका म्हणून जिल्हा आणि तालुकास्तरावर सात महिलांचा गौरवही करण्यात आला.
शासनाच्या महिला आणि बाल कल्याण विभागाकडून कुपोषण मुक्तीसाठी विशेष कार्यक्रम राबवला जात आहे. राज्यात असलेल्या 88 हजार 272 अंगणवाड्यांच्या माध्यमातून 0 ते 6 वयोगटातील बालके, तसेच गरोदर व स्तनदा मातांना पुरक पोषण आहाराचा पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील किमान 10 अंगणवाड्या विकसित झाल्या आहेत. या अंगणवाड्यांची रंगरंगोटी करून, भिंतीवर मुलांसाठी विशेष संदेश, पूर्व प्राथमिक शिक्षण मुलांना देण्यासाठी डी.एड. झालेल्या मुलींचा आधार घेणे आदी उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे.
त्याशिवाय वर्ल्ड बँकेच्या माध्यमांतून विशेष कार्यक्रमही जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत गरोदर मातांची वर्षातून चार वेळा तपासणी करणे, मातांना मार्गदर्शन करण्यासाठी गृहभेटी, हगणदरीमूक्त गाव करण्यासाठीही जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाकडून विशेष सहकार्य करण्यात येत आहे. त्याशिवाय अंगणवाडी सेविका म्हणून उत्कृष्ट काम करणा-या सहा महिलांना तालुकास्तरावर, तर एका महिलेस जिल्हास्तरावरील आदर्श अंगणवाडी सेविका म्हणून पुरस्कृत करण्यात आले आहे.