वाशिम जिल्हा: उमरा कापसे येथे अज्ञात त्वचा रोगाची साथ; विद्यार्थ्यांसह वृध्दांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:17 PM2018-01-20T13:17:53+5:302018-01-20T13:21:28+5:30
वाशिम: तालुक्यातील उमरा कापसे येथील १२ विद्यार्थ्यांसह वृध्दांना गाल, मान, हात , पायावर फोड होवून त्याला खाज सुटणाºया त्वचा रोगाची साथ पसरली आहे.
वाशिम: तालुक्यातील उमरा कापसे येथील १२ विद्यार्थ्यांसह वृध्दांना गाल, मान, हात , पायावर फोड होवून त्याला खाज सुटणाºया त्वचा रोगाची साथ पसरली आहे. आरोग्य विभागाची चमू अद्याप या गावात पोहचली नाही.
उमरा कापसे येथे काही दिवसांपासून या त्वचारोगाचा फैलाव झाला असतांना याची आरोग्य विभागाला खबर सुध्दा दिसून येत नाही. येथील एक वर्षांपासून ते ७० वर्षिय वृध्दांच्या अंगावर, मानेवर, हातावर, गालावर,पायावर फोड येवून त्याला मोठया प्रमाणात खाज येत आहे. हा त्वचारोग झाल्यानंतर ८ ते १० दिवस ओलाडल्यांवर त्याचा रंग काळा होतो व त्यानंतर मोठया प्रमाणात खाज सुरु होत आहे. गावातील या त्वचा रोगाने १० ते १२ विद्यार्थी, मुलांचा तर काही ७० वर्षिय वृध्दांचा समावेश असल्याचे गावात पाहणी केले असता दिसून आले. गावातील पुरुषोत्तम पांडुरंग कापसे (१४), मनिषा भगत (१२), पूनम विष्णू कापसे (११), अक्षय गजानन भगत (१२), दाजिबा भगत (६०), विश्वदिप वाकुडकर (१०), किसन नारायण कापसे (७०), विष्णु भागवत कापसे (३५), पांडुरंग नारायण कापसे (२३), गौतम वाकुडकर (१०), विठ्ठल देविदास कापसे (१४) सद्यस्थितीत या त्वचारोगाने त्रस्त आहेत. यामधील अक्षय गजानन भगत व दाजीबा रामजी भगत यांचा हा त्वचा रोग फार पूर्वीपासून असल्याची माहिती आहे. या आजारामुळे अंगाला येत असलेल्या खाजीमुळे विद्यार्थी, नागरिक त्रस्त असून रुग्णांनी आपआपल्या परिने खासगी उपचार सुरु केले आहेत. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होवू शकला नाही. वाशिमपासून अतिशय जवळ असलेल्या उमरा कापसे येथे त्वचारोगामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असतांना याची साधी खबर सुध्दा आरोग्य विभागाला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. येथे आरोग्य विभागाच्या पथकाने भेट देवून मार्गदर्शन करणे आवश्यक झाले आहे.